नगरपरिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालया जवळील समता स्टडी पॉईंटचा बोर्ड त्वरित हटवावा – नितीन शिंदे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव
कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नगरपरिषद इमारतीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय असे नाव देण्यात आले मात्र एका संस्थेने काही दिवसापूर्वी विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या अभ्यासासाठी समता स्टडी पॉईंटचा बोर्ड अगोदर लावलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनाल्य व ग्रंथालयाजवळील बोर्डा शेजारी लावल्याने महापुरुषाचे एक प्रकारे अवमान झाल्यासारखे आहे ते योग्य नसून त्या संस्थेने जाणीवपूर्वक प्रयत्न केला

की काय अशी समाजाची भावना होत आहे तरी समता स्टडी पॉईंटच्या या उपक्रमाचे नाव एखाद्या हॉल ला देण्यास आमची कोणतीही हरकत नाही मात्र तो बोर्ड नगरपरिषदेने त्वरित काढावा यासाठी संविधान चौक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन शिंदे नानासाहेब मोरे संपतराव भारुड शंकर बिऱ्हाडे नानासाहेब जगताप अफजल खान मौलाना जितेंद्र साळवे, रवी भालेराव सुनील जगताप सुनील त्रिभुवन यांनी सोमवार दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांना सह्यांचे निवेदन देण्यात आले सदर नगरपरिषदेने तो बोर्ड हटवला नाही तर समाज रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही
याची पूर्ण जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची असेल तरी मुख्याधिकारी यांनी समाजाच्या भावना लक्षात घेऊन व आम्ही दिलेल्या निवेदनाचा विचार करून त्वरित समता स्टडी पॉईंटचा बोर्ड काढून टाकावा ही विनंती अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.