संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या २७ अभियंत्यांना टीसीएस कंपनीमध्ये नोकऱ्या

0 5 4 1 1 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नातुन टाटा कन्सलटन्सी सर्विसेस (टीसीएस) कंपनीने संजीवनीमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केले होते. यात कंपनीने कॉम्प्युटर इंजिनिअरींग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरींग, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल इंजिनिअरींग, मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरींग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागातील तब्बल २७ नवोदित अभियंत्यांची वेगवेगळ्या वर्गवारीनुसार वार्षिक पॅकेज रू ३. ४ लाख ते रू ९ लाख देवु करून नवकऱ्यांसाठी निवड केली आहे, अशा प्रकारे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची दमदार घौडदौड सुरू असल्याचे संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.पत्रकात पुढे म्हटले आहे की टीसीएस प्राईम वर्गवारीमध्ये ऋचा रूद्रभाटे, निलम प्रभाकर हर्दे व विशाल अशोक चौधरी यांची निवड झाली आहे. टीसीएस डीजिटल वर्गवारीमध्ये हर्षालीनी बाळु पांढरे, पुजा संजीव जाधव, जयवंत बाळासाहेब वरखडे, पियुष चंद्रकांत शिंदे , दिपज्योत जपे व भूषण राजेंद्र शेलार यांची निवड झाली आहे. टीसीएस निंजा या वर्गवारीमध्ये अश्विनी अशोक म्हस्के, श्रुती देविदास नवगिरे, संकेत तुळशीराम आघाव, मयुर कैलास पवार, कोमल दौलतराव दहे, प्रद्याुम्न ज्ञानेश्वर पवार, वेदिका रविंद्र वाघ, अनिकेत मुरलीधर वाकचौरे, सायली बबनराव गवळी, शिवम सुरवाडे, श्रीकांत इल्हे ,असलेशा केदारे , अभिजीत बाबासाहेब फापाळे, रोहन गोरख भाकरे, प्रणवकुमार प्रविण चव्हाण व ओमकार प्रमोद कंक्राळे यांची निवड झाली आहे.एका पाठोपाठ एक कंपनी संजीवनीच्या अभियंत्यांची आकर्षक पगारावर निवड करीत असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये आंनदाचे वातावरण आहे.संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेले अभियंते, त्यांचे पालक, डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, सर्व विभाग प्रमुख आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे डीन डॉ. विशाल तिडके यांचे अभिनंदन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 1 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे