लोकसभेचे 7 टप्पे व ते 43 दिवस असा रंगला हा देशाचा रणसंग्राम

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव
18 व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 19 एप्रिल 2024 रोजी मतदान झाले या पहिल्या टप्प्यातील 21 राज्यातील 102 जागांसाठी मतदान प्रक्रिया संपन्न झाली तर दुसऱ्या टप्प्यातील 26 एप्रिल या दिवशी 13 राज्यातील एकूण 89 जागांसाठी मतदान पार पडले तर तिसऱ्या टप्प्यातील 7 मे रोजी 11 राज्यातील 93 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली तसेच चौथ्या टप्प्यातील 13 मे रोजी 10 राज्यातील 96 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली तसेच 20 मे रोजी पाचव्या टप्प्यातील 8 राज्यातील 49 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली तसेच 25 मे रोजी सहाव्या टप्प्यातील 8 राज्यातील 58 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली तर शेवटच्या व अंतिम सातव्या टप्प्यात आज शनिवार दिनांक 01 जून 2024 रोजी एकूण 8 राज्यातील 57 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सकाळपासून सुरुवात झाली त्या अनुषंगाने जगातील सर्वात मोठा लोकशाहीचा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या 7 टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया आज सायंकाळी संपत असून येत्या मंगळवारी 4 जून 2024 रोजी संपूर्ण देशात पुढील सरकार कोणाचे हे स्पष्ट होईल त्यासाठी 28 राज्य व 07 केंद्रशासित प्रदेशातील 543 मतदार संघात झालेली ही निवडणूक कशी पार पडली त्याचा महाराष्ट्र माझा न्युजचे संपादक बिपिन गायकवाड यांनी हा संक्षिप्त लेखाजोखा मतदारांच्या माहितीसाठी मांडला आहे.