पालिकेच्या हालगर्जीपणामुळे डेंग्यूच्या साथीने कोपरगावकर त्रस्त,उपाययोजना करा – विवेकभैय्या कोल्हे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
पावसाळा आल की साथीचे आजार वाढतात.मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आणि दुर्गंधी यामुळे अनेक सखल भागात पाणी साचून डासांचे प्रमाण वाढते.कोपरगाव शहरात नगरपालिकेच्या माध्यमांतून पावसाळ्यात साथीचे आजार प्रतिबंधक उपाययोजना वेळीच होणे अपेक्षित होते मात्र वेळीच कृती न केल्याने सध्या मोठ्या प्रमाणात डेंग्यू आजाराने प्रादुर्भाव झाला आहे.रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने तातडीने प्रभागनिहाय उपायोजना कराव्यात अशी भूमिका सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी मांडली आहे.नागरीकांना कौटुंबिक अडचणी आणि गरजा भागवून वैद्यकीय उपचारासाठी पैसा उभा करावा लागतो.सध्या वेगवेगळ्या सण उत्सवाचे दिवस समोर आलेले असताना आर्थिक गणित वाढत्या आजारांच्या कारणाने कोलमडून जाण्याची शक्यता आहे. दैंनंदिन कामकाज करून उपजीविका करणाऱ्या गोर गरीब भागातील नागरिकांना महागडे उपचार घेणे शक्य नसल्याने त्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो.

जंतुनाशक औषध फवारणी,पावडर फवारणी,पावसाळ्यात नागरिकांच्या आरोग्याची घ्यावी लागणारी काळजी हे नगर पालिकेने दक्षता घेण्याच्या दृष्टीने गतिमान पद्धतीने काम करावे.झालेल्या हलगर्जीपणाचा त्रास हकनाक नागरीकांना भोगावा लागतो आहे.डासांचे साम्राज्य वाढल्याने लहान मुले,वयोवृध्द नागरिक यांना अतिशय त्रास सहन करावा लागतो आहे.करदात्या जनतेला सुविधा देण्याची जबाबदारी प्रशासन म्हणून आपली अधिक आहे याची जाणीव ठेवत पावले उचलली जावी असे मत कोल्हे यांनी व्यक्त केले आहे.वाढत्या डेंग्यू आजाराने नागरीकांना होणाऱ्या त्रासामुळे असंख्य नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. आरोग्य,स्वच्छ पाणी,रस्ते,वीज या मूलभूत सुविधा नागरीकांना सुरळीत मिळाव्या यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे असे मत विवेकभैय्या कोल्हे यांनी व्यक्त केले आहे.