कोपरगावच्या व्यापार वृद्धीसाठी सर्वोतोपरी मदत व सहकार्य-आ.आशुतोष काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
ज्यावेळी आमदार नव्हतो आणि जेव्हापासून आमदार झालो तेव्हापासून कोपरगाव शहराच्या बाजारपेठेला पुन्हा उर्जितावस्था अवस्था पुन्हा कशी प्राप्त होईल यासाठी मी सातत्याने प्रयत्न केले आहे. आणि यापुढे देखील करीत राहणार असून कोपरगावच्या व्यापार वृद्धीसाठी माझी सर्वोतोपरी मदत व सहकार्य राहील अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशनच्या वतीने कोपरगाव येथे जागतिक व्यापारी दिनानिमित्त नवउद्योजक सन्मान सोहळा आणि ग्राहक हक्क संरक्षण प्रबोधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आ.आशुतोष काळे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काका कोयटे होते.यावेळी आयोजित करण्यात आलेल्या भव्य बाईक रॅली मध्ये आ.आशुतोष काळे सहभागी झाले होते.
शहरातील आणि शहरात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांना सोयी सुविधा मिळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे कोपरगाव शहरात भूमिगत गटारीबरोबरच इतरही विकासकामे भविष्यात करणार आहे. कोपरगाव मतदार संघाचे अर्थकारण हे बहुतांशपणे गोदावरी कालव्यांच्या पाण्यावर अवलंबून आहे.गोदावरी कालव्याच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत असलेल्या अडचणी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांच्या माध्यमातून सोडविणार आहे.मतदार संघातील जनतेने विधानसभा निवडणुकीत ज्या विश्वासाने मला राज्यात पाच नंबरच्या मताधिक्याने निवडून देवून दिलेली जबाबदारी सांभाळण्यासाठी मी सक्षम आहे.-आ.आशुतोष काळे.
या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कोपरगावच्या ज्येष्ठ व्यापारी व नवउद्योजकांचा सत्कार करण्यात आला. पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, व्यापारी म्हणजे केवळ व्यापार करण्यापुरताच मर्यादित नसून सामाजिक बांधिलकी जपणारा व नागरिकांच्या सुखदुःखात सामील होणारा एक समाजाचा महत्वाचा घटक असतो. कोपरगावच्या व्यापारी बांधवांनी देखील हि सामाजिक बांधिलकी जोपासली असुन साठवण तलावाचा गाळ काढण्यासाठी तसेच कोरोना काळात नागरिकांना सोयी सुविधा पुरविण्यात केलेली मदत निश्चितपणे अभिमानास्पद आहे.पिण्याच्या पाण्याचा ज्वलंत प्रश्न वर्षानुवर्षांपासून भेडसावत असल्यामुळे कोपरगावच्या बाजारपेठेला आलेली मरगळ पाच नंबर साठवण तलाव व विकसित रस्त्यांमुळे दूर झाली आहे. एक ते तीन नंबर साठवन तलावाच्या दुरुस्तीच्या कामाबरोबरच चार नंबर साठवण तलावाच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेला सूचना दिल्या आहेत.जेणेकरून कोपरगावच्या बाजारपेठेची आर्थिक उलाढाल वाढविण्यासाठी मददगार ठरणाऱ्या एमआयडीसीच्या निर्मितीनंतर लोकसंख्या वाढली तरी पाण्याची टंचाई जाणवणार नाही व नागरीकांना नियमितपणे पाणी मिळेल. बाजारपेठ अधिकाधिक कशी फुलली जाईल यासाठी माझे प्रयत्न सुरु असून मोक्याच्या ठिकाणी सुरु असलेले व्यापारी संकुलाचे काम व अजूनही तीन व्यापारी संकुल मंजूर झाल्यांनतर कोपरगावची बाजारपेठ इतर शहरांच्या तुलनेत निश्चितपणे आर्थिक दृष्ट्या नेहमीच गजबजलेली राहील असा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी यावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी गोदावरी दूध संघांचे अध्यक्ष राजेश परजणे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काका कोयटे, विवेक कोल्हे,राजकुमार बंब, सुधीर डागा, चांगदेव शिरोडे, अजित लोहाडे, तुळशीदास खुबानी,प्रदीप साखरे, जीवन गौरव पुरस्कार प्राप्त पंडितराव जाधव, श्रीचंद होडे, कृष्णकुमार अरोरा, दत्तात्रय कंगले, टेकचंद खुबानी, उत्तम वर्मा, उद्धवराव विसपुते, द्वारकानाथ मुंदडा, मोहनलाल सोनी, बद्रीनारायण डागा, सुंदरबाई पन्हाळे, तुळशीदास बागुल, साहेबराव जैन, पूनमचंद पांडे, सतीश कृष्णानी, सुरज पांडे, जगतराम लोंगाणी, श्रीराम राजपाल, नैनीहालसिंग पोथीवाल, नवउद्योग सत्कारमूर्ती गोपाल लोंगाणी, मंगेश सरोदे, कावेरीताई राऊत, रोहित काळे, किरण काळे, अमोल सानप, प्रशांत शेवते, पल्लवी फुलसुंदर आदी मान्यवरांसह व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.