गौतम बँकेच्या संचालकपदी संजय आगवन यांची बिनविरोध निवड

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
गौतम सहकारी बँकेच्या नैमित्तिक रिक्त झालेल्या सर्व साधारण गटातील रिक्त संचालकपदी संजय आगवन यांची बिनविरोध निवड झाली असल्याची माहिती नामदेव ठोंबळ यांनी दिली आहे.मा.जिल्हा सहकार निवडणूक अधिकारी तथा मा.जिल्हा उपनिबंधक यांचे आदेशान्वये अध्यासी अधिकारी नामदेव ठोंबळ सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कोपरगाव यांच्या अध्यक्षतेखाली गौतम बँकेच्या मुख्य कार्यालय गौतमनगर येथे मंगळवार (दि.०१) रोजी निवडणूक प्रक्रिया संपन्न होऊन संजय कारभारी आगवण यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक मा.आ.अशोकराव काळे व विद्यमान आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले असून शुभेच्छा दिल्या आहेत.याप्रसंगी व्हा.चेअरमन बापूसाहेब जावळे, संचालक राजेंद्र ढोमसे, बाबुराव थोरात, श्रीकांत तिरसे, कमलाकर चांदगुडे, बापूसाहेब वक्ते, तुकाराम हूळेकर, सुनील डोंगरे, उत्तम भालेराव, सौ. सिंधुबाई रोहोम, सौ. रुपाली संवत्सरकर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे, प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड, वरिष्ठ अधिकारी नानासाहेब बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी व्हा.चेअरमन, संचालक मंडळ व अधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित संचालक संजय आगवन यांचा सत्कार करून अभिनंदन केले.