भीमा कोरेगावला भीम अनुयायांची यंदा रेकॉर्ड ब्रेक गर्दी

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी २०२५ रोजी २०७ वा शौर्य दिनानिमित्त देशभरातील अनेक भीम अनुयायांनी त्या ५०० शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी भीमा कोरेगावला येत असतात त्या अनुषंगाने भीमा नदीच्या तीरावर असलेल्या विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी व संचलनासाठी महार रेजिमेंट बटालियनचे निवृत्त सैनिक या ठिकाणी येऊन त्यांनी मानवंदना दिली
भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाच्या चौथर्यावर सुरक्षिततेसाठी यंदा कोपरगाव येथील समता सैनिक दलाच्या जवानांनी बजावली उत्कृष्ट कामगिरी
तसेच याप्रसंगी देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य भीम अनुयायी अभिवादन व मानवंदना देण्यासाठी भीमा कोरेगावला आले होते यासाठी प्रशासनाच्या वतीने येणाऱ्या अनुयायांसाठी विविध मार्गावर भीम अनुयायांच्या वाहनांसाठी भव्य अशी ५० एकरावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती

व त्या पार्किंग परिसरामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तसेच वाहन पार्किंग स्थळावर सुरक्षितेच्या दृष्टीने आलेल्या सर्व अनुयायांची डीएफएमडी अर्थात डोर प्रेम मेटल डिटेक्टर या यंत्रणेमार्फत तपासणी करून पीएमपी च्या बस मधून विजय स्तंभा कडे पाठवले जात होते तेथून पुढे तीन किलोमीटर पायी भीमा नदी ओलांडून प्रवास करून विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी पुन्हा सुरक्षिततेच्या दृष्टीने डी एफ एम डी अर्थात डोर फ्रेम मेटल डिटेक्टर या यंत्रणे मधून तपासणी करून विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखोंचा जनसागर शांततेच्या मार्गाने मानवंदना देऊन
नवीन वर्षाची संकल्पना मनात साठवत भगवान बुद्धांच्या व महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा व व पुस्तकांची वर्षभर पुरेल एवढी ज्ञानाची शिदोरी घेऊन आपापल्या घरी परतत होते तर जेवढे परतत होते त्याच्या दुप्पट संख्येने भीम अनुयायी विजय स्तंभाकडे येताना दिसत होते जिथपर्यंत नजर पोहोचेल तिथपर्यंत फक्त आणि फक्त भीम अनुयायी दिसत होते या वर्षी भीम अनुयायांनी एक विक्रमच केला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही ३१ डिसेंबर पासूनच भीम अनुयायांयी विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी आले होते यावेळी पाचशे शूरसैनिकांचा व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयजयकाराच्या घोषणा दिल्या जात होत्या हातात
निळा व पंचशीलाचा ध्वज डोक्यावर निळी टोपी तसेच पुरुषांनी पांढरे वस्त्र तर महिलांनी पांढऱ्या रंगाच्या साड्या परिधान करून विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखोंच्या संख्येने जथेच्या जथे मानवंदना देण्यासाठी रांगेत शिस्तबद्धपणे येत व जात होते याप्रसंगी राजकीय नेते व वरिष्ठ अधिकारी विजय स्तंभास नतमस्तक होण्यासाठी आले होते यावेळी भीम अनुयायांनी मानवंदना दिल्यानंतर बाहेर उभारलेल्या पुस्तकांच्या स्टॉलवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील अनेक पुस्तके उपासकांनी खरेदी केले
तसेच भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाची प्रतिकृतीसह ५०० नागवंशी सैनिकांनी ब्रिटिशांची साथ घेऊन विषमतावादी परकीय पेशव्यांच्या सत्तेच्या २८००० सैनिकांचा केलेल्या पराभवाचा गौरवशाली इतिहास सांगणाऱ्या पुस्तकांचाही प्रचंड अशी विक्री यावेळी आलेल्या उपासक व उपासिका यांनी केली.