सहकारी संस्था चालवतांना आर्थिक शिस्त पाळली तरच संस्थेची प्रगती- आ.आशुतोष काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे त्यास बँकिंग क्षेत्र देखील अपवाद नाही. अशा स्पर्धात्मक परिस्थितीत रिझर्व बँकेच्या नियमानुसार व कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या आदर्श विचारांवर तसेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे आधारस्तंभ मा.आ.अशोकरावजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने केलेली प्रगती उल्लेखनीय आहे. राष्ट्रीयकृत बँकेच्या तोडीस तोड गौतम बँक सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा ग्राहकांना देत असून रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार सर्व निकष व नियमांची पूर्तता करणाऱ्या बँकेच्या यादीत गौतम बँकेची होणारी गणना बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याची साक्ष देत आहे. हे यश बँकेला सहजासहजी मिळालेले नसून त्यासाठी गौतम बँकेने आर्थिक शिस्तीच्या चाकोरीत राहून हे यश मिळविले आहे. त्यामुळे सहकारी संस्था चालवतांना आर्थिक शिस्त पाळली तरच संस्थेची प्रगती होते हे लक्षात घेवून यापुढेही संस्था अशीच प्रगतीपथावर ठेवा असा बहुमोल सल्ला बँकेचे मार्गदर्शक आ.आशुतोष काळे यांनी गौतम बँकेच्या संचालक मंडळाला दिला.सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या व अ.नगर, नाशिक,ठाणे, पुणे,व संभाजीनगर कार्यक्षेत्र असलेल्या ९ शाखा मधुन छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची आर्थिक गरजा वेळेत पूर्ण करणा-या गौतम सहकारी बँकेची २०२४-२५ या आर्थिक वर्षाची ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार (दि.०२) रोजी बँकेच्या गौतमनगर येथील मुख्य कार्यालयाच्या सभागृहात बँकेचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी सभासदांना मार्गदर्शन करतांना आ.आशुतोष काळे बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन संजय आगवण होते. यावेळी बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की,गौतम सहकारी बँकेने राष्ट्रीयकृत बँकेच्या बरोबरीने सर्व डीजीटल सेवा देत आहे या सेवेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा. कर्मवीर शंकररावजी काळे यांनी बँक स्थापन केल्यापासून या बँकेने अनेक चढउतार पहिले असून बँकेची हि ५० वार्षिक सर्वसाधारण सभा आहे आणि बँक देखील प्रगतीपथावर आहे. त्यामुळे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून हि सभा मोठ्या थाटामाटात सहजपणे घेता आली असती. परंतु आपल्याला कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी बचतीची शिकवण दिली आहे. त्यामुळे संस्थेचा विस्तार करून संस्थेचे संपूर्णपणे डीजीटलायझेशन करण्यात आले आहे. त्यामुळे संस्थेचा व्यवसाय वाढेल आणि संस्थेची प्रगती देखील होणार आहे.बँकेकडे १२४ कोटीच्या ठेवी व कर्ज येणे ८० कोटी ४४ लाख असून बँकेला यावर्षी ढोबळ नफा २ कोटी ३७ लक्ष झालेला आहे. त्यातून सर्व कायदेशीर तरतुदींची पूर्तता करून निव्वळ नफा १ कोटी १७ लाख ७८ हजार झाला आहे. तसेच बँकेचा निव्वळ एनपीए ०% आहे. बँकेने अहवाल सालामध्ये येवला व खेडले झुंगे या दोन शाखा नवीन सुरू केल्या असून अहवाल सालामध्येच Mobile Banking, UPI, ATM Debit card या सेवांचा शुभारंभ देखील केलेला असून ग्राहकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा. या बाबीमुळे बँकेने संपूर्णपणे डीजीटलायझेशन केल्यामुळे खर्च जरी वाढला असला तरी सभासदांना लाभांश देण्याची सुरु झालेली परंपरा खंडीत होवू न देता याहीवर्षी सहा टक्के लाभांश देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांना लघु व कुटीर उद्योग व्यवसाय शेती व शेती पूरक व्यवसायासाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ आणि आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप केले असून कर्ज वाटपात राज्यात बँक अव्वल स्थानी आहे.

बँकेने केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ बँकेच्या परिसरातील पात्र गरजू नागरिकांना व्हावा यासाठी बँक प्रयत्नशील असून त्याबाबतचा प्रस्ताव सादर केलेला आहे. स्पर्धेच्या डिजिटल युगात ग्राहकांना अद्यावत सेवा देण्यात गौतम बँक अग्रेसर राहून बँक भविष्यात प्रगतीची अनेक शिखरे सर करील असा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी यावेळी व्यक्त करून संचालक मंडळ व प्रशासनाचे कौतुक केले.प्रास्तविक करतांना प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुड यांनी बँकेच्या आर्थिक परिस्थितीचा अहवाल उपस्थित सभासदांसमोर मांडला. अडचणीवर मात करून रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बँकेचा विस्तार करून एकून नऊ शाखा झाल्या असून दहा वर्षात बँकेच्या ठेवी दुप्पट झाल्या असल्याचे सांगितले. आर्थिक वर्ष २०२४–२५ मध्ये बँकेस ऑडीट वर्ग ‘अ’ मिळाला असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे Financially Sound and Well Managed (FSWM) चे सर्व निकष पाळले आहेत. तसेच बँक आपले कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र करणार असून त्याचा प्रस्ताव सहकार खाते व रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडे देणार आहे. तसेच बँक प्रगतीच्या दिशेने यशस्वी घौडदौड करीत असल्याचे सांगितले. सभेच्या अध्यक्षपदाची सुचना बापूराव जावळे यांनी मांडली त्यास अशोकमामा काळे यांनी अनुमोदन दिले. यावेळी आर्थिक वर्ष २०२४-२५ या आर्थिक वर्षात निधन झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजलीचा ठराव संचालक व व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत तीरसे यांनी मांडला.बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे यांनी विषय पत्रिकेवरील १ ते १६ विषय मांडले त्यास सभासदांनी टाळ्यांच्या गजरात एकमताने मंजुरी दिली. याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण, संचालक दिलीपराव बोरनारे, सचिन चांदगुडे, अनिल कदम, सुभाष आभाळे, प्रशांत घुले, मनोज जगझाप, श्रीराम राजेभोसले, श्रावण आसने, डॉ.मच्छिंद्र बर्डे, तसेच ज्येष्ठ नेते छबुराव आव्हाड, विश्वासराव आहेर, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, गौतम सहकारी कुक्कुट पालनचे व्हा.चेअरमन विजय कुलकर्णी, गौतम बँकेचे माजी चेअरमन बाबासाहेब कोते, पंचायत समितीचे मा.सभापती अर्जुनराव काळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, सोमनाथराव चांदगुडे, सुभाषराव गाडे,सोमनाथराव घुमरे शरद पवार पतसंस्थेचे चेअरमन देवेंद्र रोहमारे, बँकेचे व्हा.चेअरमन सुनील डोंगरे, सर्व संचालक मंडळ, व्यवस्थापन मंडळ सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे, प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुड, कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद, पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब पतसंस्थेचे मॅनेजर मंगेश देशमुख, गौतम सहकारी कुक्कुट पालनचे मॅनेजर सुरेश पेटकर, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट चे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे, आदी मान्यवर उपस्थित होते. विषयपत्रिका वाचन, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे, प्रास्तविक प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुड यांनी केले. सभेचे सूत्रसंचालन वरिष्ठ अधिकारी नानासाहेब बनसोडे यांनी केले तर आभार बँकेचे चेअरमन संजय आगवन यांनी मानले.