आ.आशुतोष काळेंच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आशुतोष काळे यांचा सोमवार (दि.०४) रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त कोपरगाव मतदार संघात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी आ.आशुतोष काळे महात्मा गांधी जिल्हा चॅरीटेबल ट्रस्ट प्रदर्शन हॉल कोपरगाव येथे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.दरवर्षी आ.आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव मतदार संघात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्याप्रमाणे याहीवर्षी सामाजिक उपक्रम राबविले जाणार असून सोमवार (दि.०४) रोजी सकाळी ८ .००वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने स्वच्छ, सुंदर कोपरगाव या संकल्पनेतून स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.

त्याचा प्रारंभ कोपरगाव शहरातील अहिंसा स्तंभ पासून सुरुवात होणार आहे.या स्वच्छता उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कोपरगाव राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी सकाळी १० ते ०३ या वेळेत आ. आशुतोष काळे महात्मा गांधी जिल्हा चॅरीटेबल ट्रस्ट प्रदर्शन हॉल कोपरगाव येथे उपस्थित राहणार आहेत. याची राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मवीर शंकररावजी काळे व काळे परिवारावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी व हितचिंतकांनी याची नोंद घ्यावी अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.