शिंगवेच्या कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांचा काळे गटात प्रवेश

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करतांना आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघातील राहाता तालुक्यातील अकरा गावांचा देखील विकास साधला आहे. मतदार संघाचा विकास हि निरंतर चालणारी प्रक्रिया असून विकासाची एक काम पूर्ण होत नाही तोपर्यंत विकासाचे दुसरे काम पुढे येते. त्यामुळे मतदार संघाच्या विकासाची सुरु असलेली वाटचाल यापुढे देखील अविरतपणे सुरु राहणार आहे.शिंगवे ग्रामस्थांना अपेक्षित असलेला विकास आ.आशुतोष काळे यांनी केला आहेच परंतु शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा असलेला प्रश्न म्हणजे शिंगवे बंधाऱ्यात पाणी अडविण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी मोठी मदत केली आहे. व यापुढील काळात बंधाऱ्यात पाणी अडविण्याबरोबरच गावातील विकासाचे उर्वरित प्रश्न देखील आ.आशुतोष काळेच सोडवू शकतात ह्या विश्वासातून शिंगवे येथील असंख्य कार्यकर्त्यांनी काळे गटात प्रवेश करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घड्याळ हाती बांधले आहे.यामध्ये शिंगवे येथील नितीन चौधरी, शिंगवे सेवा सोसायटीचे संचालक सुनिल चौधरी, अनिल चौधरी, सुरेश बाभुळके व किरण ठोंबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.या सर्व कार्यकर्त्यांचे आ.आशुतोष काळे यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करतांना या कार्यकर्त्यांनी सांगितले की, नागरिक नेहमीच कार्यक्षम नेतृत्व आणि परिणामकारक कामगिरीला अधिक महत्त्व देतात. आ.आशुतोष काळे यांच्या माध्यमातून मागील पाच वर्षांत कोपरगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणात रस्ते, वीज, पाणीपुरवठा, आरोग्य केंद्रे यांसारखी विकासकामे झाली आहेत. विकासाच्या बाबतीत मागे असलेल्या ग्रामीण भागात झालेल्या विकासकामांमुळे सोयी सुविधांचा लाभ नागरीकांना मिळत आहे त्यामुळे जनतेमध्ये विश्वास आणि समाधानाची भावना निर्माण झाली आहे.त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेश करीत असल्याचे सांगत अजूनही कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले.याप्रसंगी माजी सरपंच ज्ञानदेव चौधरी, पद्माकर सुराळकर, निलेश चौधरी, रवींद्र बाभुळके, बाबासाहेब पवार, चांगदेव चौधरी, बाळासाहेब ठोंबरे, नारायण ठोंबरे,महेश काळवाघे, प्रमोद चौधरी आदी उपस्थित होते.