संजीवनी उद्योग समूह

शनेश्वर सोसायटीच्या अध्यक्षपदी विश्वनाथ बारगळ तर उपाध्यक्षपदी सखाहरी सोनवणे

0 6 0 2 7 6

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कोपरगांव तालुक्यातील वडगांव येथील शनेश्वर सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे विश्वनाथ वाळीबा बारगळ तर उपाध्यक्षपदी सखाहरी विठ्ठल सोनवणे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली त्याबददल त्यांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे. विश्वनाथ बारगळ यांच्या नावाची सुचना दौलतराव सोनवणे यांनी केली तर त्यास रमेश कांगणे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी मच्छिंद्र बारगळ यांनी सुचना केली तर त्यास भिमराज सोनवणे यांनी अनुमोदन दिले. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक कोपरगांव कार्यालयाचे एस. पी. नेरे उपस्थित होते. या निवडीबददल त्यांचा सत्कार करण्यांत आला.नवनिर्वाचित अध्यक्ष विश्वनाथ बारगळ सत्कारास उत्तर देतांना म्हणाले की,

जाहिरात
जाहिरात

माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सहकारी संस्थांना पाठबळ देवुन त्यामाध्यमांतुन या भागाचा विकास साधण्यांसाठी मोठे काम केले असुन तोच वसा घेवुन युवानेते, जिल्हा बँकेचे संचालक विवेक भैय्या कोल्हे हे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली काम करत आहे. शनेश्वर सोसायटीच्या सर्व सभासद शेतक-यांच्या उत्कर्षासाठी जिल्हा बँक स्तरावर असणा-या विविध योजनांची अंमलबजावणीसाठी जाणिवपुर्वक प्रयत्न करू असेही ते म्हणांले. याप्रसंगी संचालक सर्व संदिप बारगळ, सौ. जानकाबाई भागवत आंधळे, श्रीमती सावित्राबाई रामचंद्र बारगळ, उत्तमराव पायमोडे आदि उपस्थित होते. कार्यकमाचे सुत्रसंचलन सचिव आण्णासाहेब निकम यांनी करून उपस्थितांचे आभार मानले. या निवडीबददल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 2 7 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे