महिलांचे उत्तम आरोग्य हीच खरी कौटुंबिक संपत्ती – सौ.रेणुकाताई कोल्हे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने विद्यमान काळात काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे बनले आहे. कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना महिलांचे स्वतःच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष हे भविष्यातील आरोग्यसमस्या बनू नये यासाठी जागतिक महिला दिनाला मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते एस.एस.जी.एम कॉलेज येथे मोफत फिरता दवाखाना अंतर्गत कोल्हे यांनी ८ तारीख ते १६ तारीख असा महिला आरोग्य सप्ताह सुरू केला होता.
आज १६ मार्च रोजी माहेगाव देशमुख येथे शेकडो महिला भगिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली असून कोल्हे कुटुंबाने हा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल त्यांना धन्यवाद – सोनियाताई पानगव्हाणे (संचालक, सह.कोल्हे कारखाना)
कोपरगाव शहरात आरोग्य तपासणी सुरू असताना संजीवनी महिला बचत गटाचे अध्यक्षा सौ.रेणुकाताई कोल्हे यांनी भेट देऊन महिलांची आस्तेवाईकपणे विचारपूस केली.यासह संजीवनी आरोग्य मंत्र या आशयाचे महिलांच्या आरोग्याशी निगडित विविध आजार, लक्षणे आणि उपाय याची माहिती देणारे माहितीपत्रक हजारो महिला भगिनींना देण्यात आले आहे. महिला या समाज विकासाचा कणा असतात. कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना सामाजिक जबाबदारी देखील त्यांना पार पाडावी लागते. धकाधकीच्या जीवनात आणि संतुलित आहार वेळेत न घेता येण्यामुळे महिलांना अनेक लहान मोठ्या आजारांना तोंड द्यावे लागते. अशावेळी आपणच एकमेकिंच्या सखी होत आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. संपूर्ण कोल्हे कुटुंबाची भावना ही सेवा हाच धर्म असून महिला भगिनींना उत्तम आरोग्य आणि त्यासाठी अचूक मार्गदर्शन मिळावे यासाठी हा आरोग्य सप्ताह आयोजित केलेला आहे असे रेणुकाताई कोल्हे म्हणाल्या.संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि संजीवनी स्वयंसहायता महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमानाने हा स्तुत्य उपक्रम घेतला आहे.यानिमित्त कोपरगांव आणि पंचक्रोशीतील विविध ठिकाणी माता भगिनींची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून आरोग्यविषयी सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले आहे.

या प्रसंगी कोपरगांव येथील निवारा भागात महादेव मंदिर परिसरात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी भेट देऊन, सर्वप्रथम महादेवांचे दर्शन घेऊन शिबिरात तपासणीसाठी आलेल्या सर्व महिला भगिनी यांच्याशी संवाद साधला त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.महिला आरोग्य सप्ताह निमित्त वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.या सप्ताहास महिला भगिनींचा उत्तम प्रतिसाद सर्वत्र मिळाला आहे.याप्रसंगी डॉ.राधा चौधरी,डॉ.वैष्णवीताई आव्हाड, डॉ.मंजुषाताई वाकचौरे, डॉ.सुजित सोनवणे,परिचारिका निकिता खंडिझोड, दिपाताई गिरमे,विष्णुपंत गायकवाड,मंगलाताई देव,मनिषाताई बैरागी,आशाताई बैरागी,सिद्धार्थ पाटणकर आदीसह नागरिक या प्रसंगी उपस्थित होते.