शिंगणापुरच्या संवत्सरकर कुटूंबियांचे दार्तृत्व इतरांना प्रेरणादायी- सौ.रेणुकाताई कोल्हे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
स्पर्धात्मक परिक्षेत ग्रामिण भागातील मुला-मुलींनी पुढे यावे हा माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांचा ध्यास शिंगणापुरवासियांनी प्रत्यक्षात उतरविला माजी सरपंच यादवराव संवत्सरकर यांनी व्यक्तीगतरित्या या गुणवंतांचा सत्कार करण्याचे दार्तृत्व दाखविले ते इतरांना प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन कोपरगांव तालुका स्वयंसहाय्यता महिला बचतगटाच्या अध्यक्षा सौ. रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे यांनी केले. कुमारी शिल्पा कु-हे ही लोणारी समाजाचे भूषण आहे असेही त्या म्हणाल्या.तालुक्यातील शिंगणापुर येथील माजी सरपंच यादवराव संवत्सरकर यांची नात व सौ. कविता तसेच नाशिक महानगरपालिकेचे सहायक अधिक्षक महेंद्र रंगनाथ कु-हे यांची कन्या कुमारी शिल्पा ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत विशेष गुणानुक्रमाने उत्तीर्ण होवुन तिची मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहायक अधिक्षकपदी निवड झाल्याबददल तसेच भारतीय सैन्यदलात शिंगणापुरचे ९ सुभेदार, गोपाळवाडयातील दोन मुली एम. बी. बी. एस. परिक्षा उत्तीर्ण झाल्याबददल व शिंगणापुरच्या सहा मुला-मुलींनी वकीलीची सनद मिळविल्याबददल संवत्सरकर कुटूंबियांनी त्यांचाही सौ. रेणुकाताई कोल्हे यांच्या हस्ते विशेष सत्कार केला त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रारंभी माजी सरपंच यादवराव संवत्सरकर हे प्रास्तविक करतांना म्हणाले की, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी बालवाडी पासुन पी जी पर्यंतचे सर्व शिक्षण संजीवनीच्या एकाच छताखाली उपलब्ध करून दिले हा अलौकिक ठेवा आहे, तसेच या परिसरात साखर कारखान्याची कामधेनु उभारली, त्याची फळे आज अनेकजण चाखत आहे. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, युवानेते व साखर संघाचे संचालक विवेकभैय्या कोल्हे या दुस-या व तिस-या पिढीने सामाजिक कार्याचा वसा अखंडरित्या पुढे चालु ठेवला आहे. माझी नात कुमारी शिल्पा ही शासनाच्या सेवेत निवडली गेली हा माझे गांवचा अभिमान आहे. सरपंच डॉ. विजय काळे, उपसरपंच रत्ना शाम संवत्सरकर व शिंगणापुर ग्रामपंचायत सदस्यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सौ.रेणुकाताई कोल्हे पुढे म्हणाल्या की, ग्रामिण भागातील मुला- मुली मध्ये प्रचंड गुणवत्ता आहे, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले की ते स्पर्धात्मक परिक्षेतही उज्वल यश मिळवू शकतात हे आजच्या सत्कारार्थी मुला मुलींनी दाखवुन दिले आहे. माजी आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी देखील बचतगटाच्या माध्यमांतुन महिला चळवळ चालवत थेट विधीमंडळाच्या माध्यमांतुन जनसेवेचा वसा कायम ठेवला आहे. शिक्षणाबरोबरच गुणवत्तेला किंमत आहे. खेळाबरोबरच स्पर्धात्मक परिक्षेत या भागातील गुणवंत चमकले जावे म्हणून संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे नेहमीच आवश्यक तेथे मदत करून त्याबाबतचे सर्व मार्गदर्शन उपलब्ध करून देतात.

कुमारी शिल्पा हिने मुंबई शहरवासियांची उत्कृष्ट सेवा करून प्रशासकीय सेवेत कोपरगांव-नाशिकचा नांवलौकीक वाढवावा व स्पर्धात्मक परिक्षेतील तरूणांना सतत मार्गदर्शन करत रहावे.सत्कारास उत्तर देतांना कुमारी शिल्पा कु-हे म्हणाल्या की, माझे आजोबा, आई वडील व गुरूजन यांनी मला घडविले म्हणून शिंगणापुरच्या मातीत माझा सत्कार होतो आहे ही प्रेरणा माझ्या आयुष्यात अखंड ऊर्जा देणारी आहे आहे. ज्या विश्वासाने प्रशासकीय सेवेचा विडा उचलला तो सार्थ करून जनसेवेचा कायम ध्यास घेवु.याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक मच्छिंद्र लोणारी, अमृत संजीवनीचे संचालक जालिंदर आढाव, पंचायत समितीच्या माजी सदस्या सुनिता कैलास संवत्सरकर, शिंगणापुर सोसायटीचे अध्यक्ष यशवंत संवत्सरकर, उपाध्यक्ष भाउसाहेब आढाव, सर्व संचालक, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष रंगनाथ संवत्सरकर, माजी सरपंच कैलास संवत्सरकर, मंगला काशिनाथ आढाव, आशाबाई भाउलाल कु-हे, सुनिता भिमा संवत्सरकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष दत्तु संवत्सरकर, बाळासाहेब संवत्सरकर, उद्योजक संजय तुळस्कर, विधीज्ञ आप्पासाहेब लोणारी, हारकल गुरूजी, कैलास संवत्सरकर, पोलिस पाटील सविता प्रशांत आढाव, छगनराव संवत्सरकर, सुनिल कु-हे, रामभाउ पहिलवान, लहु चंद्रभान कु-हे, गणपत लगड, मनोज इंगळे, गणेश बंडु संवत्सरकर यांच्यासह शिंगणापुर, नाशिक, येवला, कोपरगांव पंचक्रोशीतील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, लोणारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन भाउसाहेब वाघ यांनी केले तर बाळासाहेब संवत्सरकर, मच्छिंद्र लोणारी यांनी आभार मानले.शिंगणापूर गावचे भूषण व सौ. कविता तसेच नाशिक महानगरपालिकेचे सहायक अधिक्षक महेंद्र रंगनाथ कु-हे यांची कन्या कुमारी शिल्पा ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत विशेष गुणानुक्रमाने उत्तीर्ण होवुन तिची मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहायक अधिक्षकपदी निवड झाल्याबददल तिचा कोपरगाव तालुका महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. रेणूकाताई विवेक कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी सरपंच यादवराव संवत्सरकर व इतर लोणारी समाज बांधव, विविध संस्थांचे पदाधिकारी, सहकारी उपस्थित होते.