कामातच राम आहे; मतदारसंघात सेवा करण्याकडे कोल्हे परिवाराचे लक्ष – विवेक कोल्हे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कामातच राम आहे या विचाराने प्रेरित होत कोपरगाव मतदारसंघात अधिकाधिक विकासकामे करण्याचे ध्येय कोल्हे परिवाराने ठेवले आहे. नेकी कर और दर्या में डाल या तत्वावर काम करण्याची परंपरा सहकार महर्षी स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांनी रुजवली असून, त्या पावलावर पाऊल ठेवत आजही सेवाभावाने काम करण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचे प्रतिपादन संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले.राहाता तालुक्यातील चितळी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा सोमवार (दि.२७) रोजी ग्रामपंचायत मंगल कार्यालयात पार पडला.या कार्यक्रमास संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, प्रथम महिला आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विवेक कोल्हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेश साखर कारखान्याचे अध्यक्ष सुधीरराव लहारे होते.सूचना प्रकाश आरणे, तर प्रास्ताविक विक्रम वाघ यांनी केले. यावेळी चितळी जळगाव यलमवाडी रामपूरवाडी वाकडी परिसरातील सर्व भाजपाचे कार्यकर्ते चितळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होत्या.प्रसंगी, ज्येष्ठ कार्यकर्ते गंगाधरनाना चौधरी मा. संचालक भाऊसाहेब नाना चौधरी, संचालक संपतराव चौधरी, विष्णुपंत शेळके, आलेश कापसे, दादा पाटील सांबारे, वाकडी गावचे सरपंच बी.एल. आहेर सर, चितळी गावचे सरपंच नारायणराव कदम, बाळासाहेब वाघ,विक्रमभाऊ वाघ,सुभाषराव तनपुरे,तुषार चौधरी,प्रकाश आरणे,योगेश बनसोडे, सुभाष कापसे,खंडेराव चव्हाण,किसनराव वाणी, वाघ सर,राजेंद्र वाणी, संभाजी गमे, ताराबाई गायकवाड, माजी सरपंच छबुराव खरात, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य चितळी, ग्रामपंचायत ग्रामसेवक,सर्व महिला भगिनी,पत्रकार बांधव, चितळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.चितळी ग्रामस्थांच्या वतीने विवेक कोल्हे यांचा सत्कार करून यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी गावातील उत्कृष्ट उद्योजक, आदर्श महिला, बचत गट तसेच चांगले उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान स्व. बाळासाहेब वाघ यांच्या स्मरणार्थ करण्यात आला. गावकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी मनोगत व्यक्त केले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्न धुमाळे यांनी केले. सुभाष तनपुरे यांनी आभार मानले.
सत्ताधारी पक्षात आहोत पण सत्तेवर नाही – विवेक कोल्हे
आपल्या भाषणात विवेक कोल्हे म्हणाले,चितळी गावात तब्बल वीस वर्षांनंतर सत्तांतर झाले. ग्रामस्थांनी परिवर्तनाचा निर्णय घेत सरपंच नारायणराव कदम यांच्या रूपाने चांगले नेतृत्व दिले आहे. मागील अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीत विकासकामांचा दुष्काळ होता; मात्र आता चांगल्या विचारांच्या नेतृत्वाखाली कामे गतीमान झाली आहेत.ते पुढे म्हणाले,आपण सत्ताधारी पक्षात आहोत, पण सत्तेवर नाही. त्यामुळे अनेक विकासकामे मार्गी लावण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. तथापि, आम्ही संयमाने आणि धैर्याने प्रयत्न करत आहोत. अलीकडेच संजीवनी साखर कारखान्याच्या सीबीटी प्लांटचे लोकार्पण झाले असून, पक्षश्रेष्ठींनी योग्य वेळी न्याय मिळेल अशी ग्वाही दिली आहे.युवा नेते विवेक कोल्हे पुढे म्हणाले,ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध योजना राबवून कामे पूर्ण केली जातात. परंतु, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतील प्रशासकीय अडचणींमुळे काही प्रकल्पांवर परिणाम झाला.तरीदेखील, आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गावाच्या तळे व पाणीपुरवठा योजनेसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा करून हे काम निश्चितपणे पूर्ण करू.त्यांनी पुढे सांगितले की,गेल्या काही वर्षांत चितळी गावाने कोरोनासारख्या संकटांचा सामना करून पुन्हा विकासाच्या मार्गावर पाऊल ठेवले आहे. जवळपास ८० नागरिकांना गमावल्यावरही ग्रामस्थांनी आत्मविश्वास गमावला नाही, हेच या गावाचे सामर्थ्य आहे.यावेळी सरपंच नारायणराव कदम म्हणाले,आमदार स्नेहलताताई कोल्हे, बिपीनदादा कोल्हे आणि विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत चितळीने विविध विकासकामांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. गावातील तळ्यातील गाळ काढण्यासाठी ४ लाख २२ हजार रुपये खर्च करून स्वच्छता व पाण्याची व्यवस्था सुधारली आहे.ते पुढे म्हणाले,“गावातील मंगल कार्यालयाचे बांधकाम कोल्हे ताईंच्या माध्यमातून आमदार निधीतून पूर्ण झाले असून, आता लग्नसमारंभासाठी फक्त १,१०० रुपयांची पावती फाडून ग्रामपंचायत मंगल कार्यालयात कार्यक्रम आयोजित करता येणार आहे. ही सुविधा सर्व नागरिकांसाठी खुली आहे.सरपंच कदम यांनी सांगितले की, ग्रामपंचायतच्या माध्यमातून सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे, कामे, बांधकाम कामगारांचे प्रश्न शाळेतील शैक्षणिक सुविधेचे आणि गावातील शिक्षण व सामाजिक सुविधांमध्येही सुधारणा करण्यात आली आहे.प्रास्ताविक करताना युवा नेते विक्रम वाघ म्हणाले,२०१४ ते २०१९ दरम्यान आमदार स्नेहलता ताई कोल्हे यांनी खऱ्या अर्थाने विकास कसा करावा याचे उत्तम उदाहरण मतदारसंघासमोर ठेवले. त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी शेततळे, मोटारपंप, रस्त्यांची बांधणी, गारपीटग्रस्तांना मदत अशा अनेक योजना राबवण्यात आल्या.”ते पुढे म्हणाले,“मार्च २०१५ मधील गारपीटग्रस्तांना दुसऱ्याच दिवशी स्नेहलताताई भेटल्या आणि ६५ लाख रुपयांची मदत तत्काळ मंजूर करून दिली. महिलांसाठी बचतगटांद्वारे आर्थिक सक्षमीकरण केले. स्मशानभूमीसाठी १० लाख रुपयांचे शेड, १५ लाख रुपयांचे सांस्कृतिक भवन आणि सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यांच्या कामामुळे चितळी ग्रामस्थांमध्ये आजही त्यांच्याविषयी आदरभाव आहे.




