सध्याच्या काळात दुर्योधन आणि मंथरा वृत्तीचे मैत्रत्व नको-साध्वी सोनाली दिदी कर्पे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
रामायण हे जीवनाचे सार आहे, त्यातील प्रत्येक सुत्रातुन दैनंदिन जीवन सुखकाराचा मंत्र मिळतो, मनुष्याच्या जीवनांत मित्र कसे असावे याची शिकवण रामायणातुन मिळते, सध्याच्या काळात दुर्योधन आणि मंथरा वृत्तीच्या मैत्रत्वांने घात होतो तेंव्हा प्रत्येकांने अशा मैत्रीपासुन दुर रहावे असे प्रतिपादन साध्वी सोनालीदिदी कर्पे यांनी केले.शहरातील संत ज्ञानेश्वरनगरी तहसिल कार्यालय मैदानावर माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या तिस-या पुण्यतिथीनिमीत्त कल्याणस्वामी संस्थान चकलंबा (गेवराई-बीड) अन्नपुर्णा माता महिला वारकरी शिक्षण संस्थेच्या संस्थापिका, साध्वी सोनालीदिदी कर्पे यांच्या रसाळवाणीतुन संगीतमय प्रभु श्रीरामकथेचे आयोजन करण्यांत आले असुन त्याचे चौथे पुष्प गुंफतांना त्या बोलत होत्या.

प्रारंभी अनिकेत कोल्हे यांनी सपत्नीक रामायण ग्रंथ व साध्वी सोनालीदिदी कर्पे यांचे पुजन केले. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, माजी आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे, सौ.रेणुकाताई कोल्हे व सौ.श्रध्दाताई कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.साध्वी सोनालीदिदी कर्पे पुढे म्हणाल्या की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी उद्योग समूह व साखर कारखानदारीतुन ग्रामिण अर्थकारणाची कामधेनू जीवंत ठेवत प्रत्येकाच्या हाताला काम दिले. श्रीमती सिंधुताई यांनी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या जीवनांत खंबीरपणे साथ देत लक्ष्मीच्या पावलाने कुटूंब व्यवस्थापन सांभाळले त्यामुळे स्व. कोल्हे यांना समाजकारणांसाठी प्रसंगानुरूप निर्णय घेवुन काम करता आले. गोदावरी नदीवर हिंगणी येथे त्यांनी पहिला कोल्हापूर पध्दतीचा बंधारा बांधून येथील शेतीला शाश्वत पाणी उपलब्ध करून दिले.,
सुदर्शन महाराजांच्या झांकीने व्यासपिठावर साकारलेल्या राम वनवासाच्या प्रसंगांने कथा श्रवणकर्त्यांच्या डोळयात पाणी आणले. कोपरगांव शहर व ग्रामिण भागातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नियोजनबध्द आरती पार पडली. सोनालीदिदी कर्पे गायनविशारद असल्यांने पहाडी आवाजात त्यांनी सादर केलेल्या कथेतील प्रत्येक गीतांला भाविकांनी मंत्रमुग्ध साथ दिली. महिला, पुरुष भाविकांनी फेर धरत कथेत लयबद्ध भजन संगीताच्या चालीवर नाचण्याचा आनंद घेतला.
पाणी अडवा पाणी जिरवा उपकमातुन भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविली. स्व. शंकरराव कोल्हे दार्तृत्ववान होते म्हणूनच या भागात संपन्नता आहे. त्या पुढे म्हणाल्या की, मर्यादापुरूषोत्तम रामाने समाजाचे सदैव भले केले. रामाकडुन बंधुप्रेम, समर्पण, संघटन, ब्रम्ह अनुभुती, आदर्श, वचनपुर्ती, अज्ञाधारी, धाडस, सदाचार, करूणा, धर्ममार्ग, आदि विचारांची शिकवण मिळते. राम नामाने पातक नाहीसे होते, राम विचार लाखमोलाचा आहे. हल्लीच्या काळात विचार विसंगत झाले की, संसारात सतत विघ्न येतात. जो बदलतो त्याचे नांव काळ आहे. हल्लीची युवापिढी नको त्या विचाराने भरकटत चालली आहे, मुलींची संख्या कमी असल्यांने लग्नकर्तव्यात बाधा निर्माण झाली आहे,

ज्या मुली लग्न होवुन सासरी जातात त्यांनी सासर हेच माहेर समजुन आपली कर्तव्य पार पाडावीत, मुलीच्या संसारात आईचा हस्तक्षेप वाढल्यांने नको त्या अडचणी वाढायला लागल्या आहेत., समाजव्यवस्थेचे असंतुलन वाढत चालले त्याबाबतही कथेच्या व्यासपिठावरून प्रबोधनाची जबाबदारी साधु-संत-साध्वी-महंत, हरिभक्त परायण, अध्यात्मीक क्षेत्रात काम करणा-या मंडळीवर येवुन पडली आहे. बापाचं मन कुणी जाणायला तयार नाही उलट हल्लीचे मुले-मुली त्यांनाच जबाबदार धरून आमच्यासाठी काहीच केले नाही म्हणून कुटूंबे दोष देत आहेत,
घर-नातं तोडण्यापेक्षा जोडा, वेळप्रसंगी सुई व्हा पण कात्री होवु नका, ज्यांच्या वयाची सत्तरी-पंच्याहत्तरी झाली त्यांनी संसारापेक्षा परमार्थाकडे अधिक लक्ष द्यावे असे त्या म्हणांल्या. रामराज्याभिषेक, दशरथांकडे कैकयीने केलेला हट्ट याचेही त्यांनी सखोल विवेचन केले. शेवटी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांनी आभार मानले. संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सेवकांनी कार्यक्रम यशस्वीततेसाठी प्रयत्न केले. लाल वस्त्र परिधान केलेल्या महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.