सनातन धर्म पुढे नेण्याचे काम ब्राम्हण समाज करत आहे- खा.मेधा कुलकर्णी

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
ब्राम्हण समाज विविध क्षेत्रात सगळे क्षितीज ओलांडून भरारी घेत आहे. समाजाने कधी हि आरक्षण मागितले नाही. स्वकर्तुत्वावर पुढे जाण्याचा विचार समाजाने जोपासला आहे.सनातन धर्म पुढे नेण्याचे काम ब्राम्हण समाजाने केले आहे असे प्रतिपादन राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी कोपरगाव येथे केले.देशाला पुढे घेवून जाणाऱ्या व विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या विचारधारे समवेत ब्राम्हण समाज नेहमी उभा राहतो असे हि त्या पुढे म्हणाल्या. कोपरगाव ब्राम्हण सभा आयोजित ब्रम्हगौरव गुणगौरव पुरस्कार व आमदार आशुतोष काळे यांच्या १० लाख रुपयांच्या निधीतून उभे राहिलेल्या भोजनगृहाचे उदघाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून खा.मेधा कुलकर्णी बोलत होत्या.याप्रसंगी व्यासपीठावर आमदार आशुतोष काळे,माजी आमदार स्नेहलता कोल्हे, विश्राम कुलकर्णी,माजी नगराध्यक्ष संजय सातभाई,ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई,ब्राम्हण सभेचे अध्यक्ष मकरंद कोऱ्हाळकर,उद्योजक प्रसाद नाईक,मेंदुरोग तज्ञ डाॕ.डुबेरकर आदि यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी दहावी,बारावी व पदवीधर परीक्षेत यशस्वी झालेल्या समाजातील विद्यार्थ्यांना विशेष गुणगौरव करण्यात आला. विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा ब्रम्हगौरव पुरस्कार देवून यावेळी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष मकरंद कोऱ्हाळकर यांनी केले.यावेळी पुढे बोलतांना खा.मेधा कुलकर्णी म्हणाल्या की ब्राम्हण समाजाने आपल्या पुढील पिढीला सनातन धर्म काय आहे, समाज, संस्कार यांची माहिती द्यावी. समाजासाठी, एकत्र येणे,एकमेकांना मदत करणे हि काळाची गरज आहे असे शेवटी कुलकर्णी म्हणाल्या यानंतर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यावेळी म्हणाल्या की तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी यांचे विधानसभेतील कार्य आक्रमक होते. प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी भांडणे आणि मांडणे हा त्यांचा गुण जवळून अनुभवता आला. राज्यसभेत महिलांचे प्रतिनिधित्व म्हणून त्यांच्या निवडीचा आम्हाला अभिमान आहे.
सर्व पुरस्कार विजेत्यांचे त्यांनी अभिनंदन केले.या प्रसंगी आमदार आशुतोषदादा काळे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत १० लक्ष रुपये निधीतून ब्राह्मण समाजासाठी बांधण्यात आलेल्या भोजनगृह कक्षाचे उदघाटन आमदार आशुतोष दादा काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या वेळी त्यांनी भविष्यात देखिल सर्वतोपरी मदत करण्याचे जाहिर केले. समाजातील कर्तृत्ववान विजेत्यांना पुरस्कार देवुन एक आदर्श व्यक्तीमत्व समाजापुढे आणुन एक चांगला उपक्रम सुरु केल्याबद्दल ब्राह्यण सभेचे कौतुक केले.तसेच प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक यांनी मंगल कार्यालय लवकरात लवकर सर्वासाठी खुले करणार असल्याचे त्यांनी सांगितले या वेळी ब्राम्हण सभेचे उपाध्यक्ष- गोविंद जवाद,बाळकृष्ण कुलकर्णी, सचिव- सचिन महाजन,सहसचिव- संदीप देशपांडे, खजिनदार- जयेश बडवे,सहखजिनदार -योगेश कुलकर्णी, संघटक- महेंद्र कुलकर्णी,गौरीश लव्हरीकर जेष्ठ मार्गदर्शक सुधाप्पा कुलकर्णी, माजी नगराध्यक्षा ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई
बांधकाम समिती प्रमुख प्रसाद नाईक,वसंतराव ठोंबरे,संजीव देशपांडे,डॉ. मिलिंद धांरणगावकर, अनिल कुलकर्णी,
अॕड.श्रद्धा जवाद,वंदना चिकटे, अजिंक्य पदे, सदाशिव कुलकर्णी आदींनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परीश्रम घेतले याप्रसंगी जेष्ठ पत्रकार कै.सदाशिव कुलकर्णी यांना मरणोत्तर ब्रम्हचैतन्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी ब्राम्हण सभेचे पदाधिकारी, समाज बांधव,गुणवंत विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता कोऱ्हाळकर व वृषाली कुलकर्णी यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सहसचिव संदीप देशपांडे यांनी मानले.