संविधान चौक फाउंडेशन च्या वतीने नगरपरिषद शाळेतील विद्यार्थ्यांना केले वह्यांचे वाटप

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहरातील टिळक नगर येथील संविधान चौक फाउंडेशन च्या वतीने बुधवार दिनांक 26 जून 2024 रोजी जनतेचे राजे राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त नगर परिषद शाळा क्रमांक 6 तसेच शाळा क्रमांक 1 व उर्दू शाळा क्रमांक 4 मधील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संविधान चौक फाउंडेशन च्या वतीने वह्यांचे वाटप करण्यात आले
यावेळी राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन बुद्दिष्ट यंग फोर्सचे अध्यक्ष विजय त्रिभुवन तसेच संविधान चौक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन शिंदे शाळा क्रमांक 6 च्या मुख्याध्यापिका साळुंके मॅडम तसेच शाळा क्रमांक 1 च्या मुख्याध्यापिका एम के नरवडे व उर्दू शाळा क्रमांक 4 च्या मुख्याध्यापिका शबनम खान तसेच संविधान चौक फाउंडेशनचे नानासाहेब मोरे जितेंद्र साळवे सुनील वाहुळकर नितीन साबळे
रवी भालेराव शंकर बिऱ्हाडे ॲडवोकेट नितीन पोळ दिपक शिरसाट सर भीमराज रणशूर रवींद्र धिवर भारत सदर वामन सातदिवे सुनील जगताप आदींसह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार शाळा क्रमांक 6 चे शिक्षक अरुण पगारे सर यांनी मानले.