दत्त शिरोळ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष रघुनाथ देवेगौडा पाटील यांची सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यास सदिच्छा भेट

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
दत्त शिरोळ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष रघुनाथ देवेगौडा पाटील व त्यांच्या शिष्टमंडळाने सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यास नुकतीच सदिच्छा भेट देवुन पाहणी केली त्याबददल त्यांचा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व कारखान्याचे अभ्यासु युवानेतृत्व विवेक भैय्या कोल्हे यांच्यावतीने संचालक बाळासाहेब वक्ते यांनी सत्कार केला.प्रारंभी कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव जी. सुतार यांनी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे साहेब व युवा नेतृत्व कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे साहेब यांच्या मार्गदर्शनांखाली कारखाना व उप प्रकल्प पुर्ण क्षमतेने चालविणेचा प्रयत्न सुरू आहे तसेच उस विभागामार्फत उसाचे अतिरिक्त उत्पादन वाढविण्यासंदर्भात ठोस कृती कार्यकम हाती घेतला असल्याची माहिती दिली. याप्रसंगी सत्कारास उत्तर देतांना रघुनाथ देवेगौडा पाटील म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी देशात सहकारी साखर कारखानदारीत आधुनिक तंत्रज्ञानाचा कार्यक्षम वापर करून कमी पाण्यांत अधिक उस उत्पादन देण्यां-या उस जातींचा अभ्यास करत सभासद शेतक-यांच्या उत्पादनवाढीत मोलाची भर घातली त्यांची प्रकर्षाने आठवण होते.तसेच दत्त शिरोळ सहकारी साखर कारखान्यांने २५०० एकरा पैकी १५०० क्षारपड जमीनींची सुधारणा उद्यान पंडीत व सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते, माजी चेअरमन श्री. गणपतराव दादा आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली करून त्यातुन प्रति एकरी ६० ते ७० मे. टन उसाचे उत्पादन घेण्याचा कृतीशील कार्यक्रम हाती घेतला याची केंद्र सरकारने व जगभरातील सर्व क्षारपड संस्थांनी नोंद घेवुन दत्त कारखान्याचे या कामाचे देशपातळीवर व जगातील नामांकित संशोधन संस्थांनी कौतुक केले आहे. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील अशा क्षारपड जमिनी विकसीत करण्यांबाबत आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य देवु अशी ग्वाही दिली. शेवटी केन मॅनेजर जी. बी. शिंदे यांनी आभार मानले, सूत्रसंचलन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर प्रकाश डुंबरे यांनी केले.