आत्मा मालिक

शिर्डी-कोपरगाव महामार्गावरील प्रलंबित रस्त्याच्या कामांसाठी आत्मा मलिकचे आंदोलन

0 5 3 5 4 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

शिर्डी-कोपरगाव महामार्गावरील रस्त्याचे प्रलंबित काम आणि त्यावरील सुरक्षेच्या अभावामुळे अपघातांची संख्या वाढत आहे. आत्मा मालिक ध्यानपीठ कोकमठाण ट्रस्टने वारंवार संबंधित प्राधिकरणांकडे पत्रव्यवहार आणि तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. याबाबत सविस्तर वृत्त असे की शिर्डी कोपरगाव मार्गावर अपघातांची चिंताजनक अशी स्थिती निर्माण झाली असून आत्तापर्यंत आत्मा मालिक रुग्णालयाने ११५ हून अधिक अपघात ग्रस्त रुग्णांची नोंद आत्मा मालिक मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल मध्ये नोंद झाली आहे या अपघातांमध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून काही जण कायमस्वरूपी अपंगत्व आले आहेत. याबाबत मुख्य समस्या अशी की सुरक्षितेच्या दृष्टीने या मार्गावर अनेक त्रुटी आहेत या त्रुटी लक्षात घेता या महामार्गाच्या बाजूला विश्‍वात्मक जंगली महाराज आश्रम,आत्मा मालिक रुग्णालय आणि शैक्षणिक संकुलामुळे हजारो विद्यार्थी व त्यांचे पालक तसेच देशासह परदेशातून येणारे भाविक आणि प्रवासी दररोज या रस्त्याचा वापर करतात. मात्र, रस्त्यावर आवश्यक स्पीड ब्रेकर, झेब्रा क्रॉसिंग, उड्डाणपूल किंवा सर्व्हिस रोड उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना तसेच भाविकांना या मार्गावरून प्रवास करताना मोठा मनस्ताप होत आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या एका अपघातात हेमराज पाटील हे याच महामार्गावर गंभीर जखमी झाले,तर एक बस व टँकरच्या धडक झाल्याने मोठा अपघात घडला आहे तेव्हा या महामार्गाबाबत ज्या काही त्रुटी आहेत त्याबाबत आत्मा मालिक ट्रस्टने संबंधित प्राधिकरणांला २८ डिसेंबर २०२४ ला या मार्गावर काय उपाययोजना करता येतील याबाबत काही मागण्या केले आहे त्यामध्ये प्रामुख्याने “स्पीड ब्रेकर” आणि “झेब्रा क्रॉसिंग” लवकरात लवकर बसवणे तसेच उड्डाणपूल व सर्व्हिस रोड यांसारख्या सुरक्षात्मक उपायांची अंमलबजावणी करावी सदर मागण्या पूर्ण न झाल्यास 28 डिसेंबर पर्यंत योग्य ती कार्यवाही न झाल्यास ट्रस्टचे सदस्य, भक्तगण आणि अनुयायी शांततेच्या मार्गाने आंदोलन करतील आंदोलन करताना अपघात झाल्यास संबंधित प्राधिकरणांवर हत्येचा प्रयत्न किंवा हत्या FIR दाखल करण्यात येईल आणि अपघाताचा संपूर्ण खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल. तेव्हा संबंधित विभागांने नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात,अशी विनंती ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 5 4 5

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे