बस स्थानक व्यापारी संकुल लवकरच व्यावसायिकांसाठी उपलब्ध होईल -आ.आशुतोष काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव बसस्थानका लगत व्यापारी संकुल उभारले असून बेरोजगारांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. बेरोजगारांना व्यवसाय करण्यासाठी लवकरात लवकर हे व्यापारी संकुल उपलब्ध व्हावे यासाठी कोपरगाव बस स्थानकाच्या व्यापारी संकुलाचे काम युद्धपातळीवर सुरु असून हे व्यापारी संकुल लवकरच व्यवसायिकांसाठी उपलब्ध होणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच १४ कोटी निधीतून कोपरगाव शहरात सुरु असलेल्या कोपरगाव बस स्थानकाच्या व्यापारी संकुलाच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी करून या कामाचा आढावा घेतला याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, जास्तीत जास्त बेरोजगारांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी बसस्थानक व्यापारी संकुल, नगरपरिषद समोरील दोन व्यापारी संकुल, बाजार तळ व्यापारी संकुल या व्यापारी संकुलाचे काम प्रगतीपथावर आहेत. शेजारील तालुक्याच्या बस स्थानकाप्रमाणे बसस्थानकालगत व्यापारी संकुल उभारून जास्तीत जास्त बेरोजगारांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे. सुरु असलेल्या व्यापारी संकुलाची पाहणी करून हि कामे गुणवत्तापूर्ण होवून लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी सूचना दिल्या आहेत.भविष्यात गरज भासल्यास व्यापारी संकुलाचा विस्तार करण्यासाठी दुमजली व्यापारी संकुल तीन मजली करण्याचा मनोदय आहे. भविष्यात या व्यापारी संकुलाचे विस्तारीकरण करण्याबरोबरच कोपरगाव शहरात ज्या ठिकाणी व्यापारी संकुलासाठी जागा उपलब्ध होईल त्याठिकाणी व्यापारी संकुल उभारण्यासाठी निधी आणून जास्तीत जास्त बेरोजगारांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मनोदय आ. आशुतोष काळे यांनी यावेळी व्यक्त केला.