आमदार आशुतोष काळे उद्योग समूह

आमचं ठरलं ते ठरलं पण काही लोक व्यासपीठावर अजूनही दिसत नाही आ.आशुतोष काळेंचा कोल्हेंना चिमटा

0 5 4 1 2 9

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव 

आमचं ठरलं ते ठरलं आमच्या शब्दात बदल नसतो हे मतदार संघातील जनतेने पाहिले आहे. मात्र काही लोक सांगतात एक आणि करतात एक. ते अजूनही व्यासपीठावर दिसत नाही त्यामुळे खासदार साहेब काळजी घ्या असा अप्रत्यक्षपणे मिश्किल चिमटा आ.आशुतोष काळे यांनी कोल्हेंना काढला आहे.
मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्या शिर्डी येथील भेटीनंतर आम्ही कुणाच्या पाठीत खंजीर खुपसनार नाही. आमच्या ओठात एक,पोटात एक नाही असे मा.आ.कोल्हेंनी प्रसार माध्यमांसमोर केलेल्या वक्तव्याचा धागा पकडत आ.आशुतोष काळेंनी त्यांना मिश्किल चिमटा काढला आहे.कोपरगाव येथे राज्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील व आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते व शिर्डी लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार खा.सदाशिव लोखंडे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी व्यासपीठावर कोल्हे उपस्थित नसल्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना खा.सदाशिव लोखंडेंना काळजीवजा सल्ला देतांना कोल्हेंना देखील अप्रत्यक्षपणे मिश्किल चिमटा काढला.

जाहिरात
जाहिरात

आ.आशुतोष काळे म्हणाले की,२०१४ ला खा. लोखंडे साहेबांना उमेदवारी मिळविण्यापासून ते निवडून आणण्यापर्यंतची जबाबदारी चोखपणे पार पाडली हे संपूर्ण मतदार संघाने पाहिले आहे.आमच्या जे पोटात असते तेच आमच्या ओठावर असते त्यामुळे आमचं ठरलं ते ठरलं त्यापासून मागे हटायचे नाही जे ठरलं ते करून दाखवायचं.त्यामुळे आमचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. तुम्हाला जास्तीत जास्त मतदान घडवून आणतील तुम्ही बिनधास्त रहा.मात्र काहींच्या पोटात एक आणि ओठात एक असते ते लोक आजही व्यासपीठावर कुठे दिसत नाही त्यामुळे मला काळजी वाटते तुम्ही पण काळजी घ्यावी असा चिमटा आ.आशुतोष काळे यांनी कोल्हेंना काढला.यावेळी महायुतीच्या सर्व पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 1 2 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे