संजीवनी उद्योग समूह

तिळवणी बंधाऱ्याचे विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते जलपूजन संपन्न

0 5 3 8 1 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

तिळवणी येथील तळवाडे नाल्यावरील एकूण चार साठवण बंधारे पालखेड कालवा चारी नंबर ५१ वरून भरून देण्यात आले, या बंधाऱ्यांचे जलपूजन युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी रवींद्र शिंदे,सुरेश शिंदे,ज्ञानेश्वर शिंदे यांनी सपत्नीक विधिवत जलपूजा केली.या वेळी बोलताना विवेकभैय्या कोल्हे म्हणाले की पाऊस झालेला असतानाही या काही वर्षात हक्काचे पाणी मिळण्यासाठी भांडावे लागते हे दुर्दैव आहे.जेव्हा गोदावरीचे पाणी डोळ्यादेखत वाहून जाते तेव्हा आपली शेती उजाड होते हे माहीत असून समन्यायी काळा कायदा डोळे झाकून मंजूर केला.स्व.कोल्हे साहेबांनी पूर्व भागावर विशेष प्रेम केले.स्व.साहेब गेल्यानंतर जर काही संपत्ती मागे ठेवली असेल तर जीवाला जीव देणारे कार्यकर्ते आयुष्याच्या तिजोरीत जोडून दिले आहे.मला काम करण्यावर विश्वास आहे दिवसेंदिवस तीन हजार तर कधी साडे तीन हजार असे हजारो कोटी फ्लेक्सवर वाढत आहे प्रत्यक्षात मात्र मतदारसंघ अनेक वर्षे मागे गेला आहे.पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळवले तर शेती,उद्योग आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघेल.स्नेहलताताई कोल्हे यांनी निळवंडे धरणाचे काम पूर्ण होऊन चाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी अधिवेशनात पायरीवर बसून आंदोलन केले.मला काम करून डोळ्यांना दिसेल प्रत्यक्षात तुम्हाला विश्वास बसेल असा विकास करण्याला प्राधान्य द्यायचे आहे. केवळ कोपरगाव आणि परिसरच नाही तर महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे काम करून दाखवेल असे विवेकभैय्या कोल्हे म्हणाले.कोल्हे कुटुंबाचा पूर्वभाग हा हक्काचा आहे कारण त्यांनी पाण्यासाठी मोठे काम केले आहे.पाण्यासाठी काळे कुटुंबांचे कवडीचे योगदान नाही.एकही बंधारा त्यांनी पूर्व भागात बांधला नाही मात्र जलपुजनाचे नाटक करण्यासाठी येतात.येत्या निवडणुकीत त्यांना एक दिवसात पाणी बंद केले

विरोधकांचे काम शून्य आणि प्रसिध्दी जास्त असा बालिश प्रकार सुरू आहे.केवळ वेड्यात काढून आपले निवडणुकीचे राजकारण साध्य करायचे आणि वेळ निघून गेली की परत तुम्ही कोण आम्ही कोण असे वागायचे हे काळे कुटुंबाचे काम आहे अशी भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

होते याचा धडा शिकवू असा एल्गार उपस्थित शेतकरी आणि युवकांनी केला.कोल्हे यांनी केवळ पाणी आणले नाही तर बंधारे भरण्यासाठी येणारी अडचण दूर करण्यासाठी जे सी बी उपलब्ध करून दिले यावर युवकांनी असा कृती करणारा नेता आम्हाला हवा अशी बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली.पालखेडचे पाणी कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील गावांना मिळावे यासाठी युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी प्रयत्न केले होते त्यानंतर श्रेय घेण्यासाठी घटकाभर पाणी सोडून पूजन केलेल्या आमदार काळे यांच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी रोष व्यक्त केला.एक दिवसात पाणी बंद झाले त्यामुळे काळे यांचे जलपूजन नाटक ठरले होते.याच वेळी पाझर तलाव आणि साठवण बंधारे कोरडे राहू नये म्हणून कोल्हे यांनी थेट येवला येथील पालखेड कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना वस्तुस्थिती लक्षात आणून दिली त्यानंतर पाणी सोडण्यात आले होते त्यातून विविध बंधारे काठोकाठ भरून शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अनेक गावांचा सुटला आहे याचे समाधान व्यक्त केले जाते आहे.यावेळी औद्योगिक वसाहतीचे व्हा.चेअरमन केशवराव भवर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहम, मा.पंचायत समिती सदस्य उत्तमराव चरमळ,बा.समिती संचालक रेवन निकम,साहेबराव लामखडे,बाबासाहेब मोकळ,लक्ष्मणराव वाघ,अंबादास पाटोळे,जनार्दन शिंदे,माधवराव रांधवणे,बाबुराव रांधवणे,किसनराव गव्हाळे,हरिभाऊ गव्हाळे,सोपानराव गव्हाळे,प्रभाकर उकिरडे,अशोक शिंदे,अशोक निवृत्ती शिंदे,केशव गायकवाड,दादासाहेब सुंबे, रंजन साळुंके,भाऊसाहेब वाकचौरे,भाऊसाहेब उसरे,शंकर शिंदे,मनोज तुपे,भाऊसाहेब शिरसाट,पिराजी शिंदे,बबन साळुंखे,रवींद्र गायकवाड,सोमनाथ शिंदे,गणेश शिंदे,अनिल भोकरे आदींसह पंचक्रोशीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 8 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे