गुरुप्रति असलेली श्रद्धा भावनिक शब्दांमध्ये -गौतम बनसोडे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
आषाढ पौर्णिमेला गुरूपौर्णिमा तसेच व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. हिंदू धर्मात तर गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. गुरुपौर्णिमा यावर्षी रविवारी २१ जुलै रोजी आली. या दिवसाचे महत्त्व हे फारच खास आहे. हा दिवस महर्षी व्यासमुनींचा जन्म दिवस म्हणूनही ओळखला जातो. महर्षी वेद व्यास यांच्या जन्मापासून गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपूजेची परंपरा शतकानुशतके सुरू आहे. असं म्हणतात की, वेदव्यासांनी मानवजातीला सर्वात आधी चार वेदांचे ज्ञान दिले. त्यामुळे या दिवशी आपल्या गुरूंचा आशीर्वाद घेणे शुभ मानले जाते. म्हणून गुरु पौर्णिमा ही शिष्याने गुरूंचा सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समर्पित दिवस आहे. त्या अनुषंगाने कोपरगाव शहरामध्ये एक अनोखा आपल्या पक्षाच्या सीमा ओलांडून गुरु शिष्यांची अनोखी गुरुपौर्णिमा साजरी करतांना वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव गौतम बनसोडे हे पूर्वीपासूनच संदीपजी वर्पे यांना आपले गुरु मानत आलेले आहे संदीपजी वर्पे जरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाचे असले तरी पक्षाच्या सीमा ओलांडून या दोघांची नाती अखंडित आहे त्यामुळे आज खऱ्या अर्थाने शिष्याने गुरूंचे आशीर्वाद घेतले अशा प्रकारच्या अनोखे नाते या जगात फारच दुर्मिळच बघायला मिळते आहे त्यामुळे आज दोघांनीही दोघांच्याही राजकीय पक्षाच्या सीमा ओलांडून गुरु शिष्यांची अनोखी गुरुपौर्णिमा वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव गौतमराव बनसोडे यांनी हे दाखवून दिले