जसा अविवेकी नेता तसेच त्यांचे अविवेकी कार्यकर्ते आत्ताच बेताल वक्तव्य तर पुढे काय-उपसरपंच दीपक चौधरी

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
सातत्याने साहेबांची शिकवण, साहेबांची शिकवण असे वक्तव्य करायचे प्रत्यक्षात विवेकशून्य नेत्याची कृती मात्र शून्य. अशीच काहीशी परिस्थिती त्यांच्या कार्यकर्त्यांची झाली असून ज्यांची लायकी नाही ते तालुक्याच्या लोकप्रतिनिधींवर खालच्या पातळीची टीका करतात यावरून जसा अविवेकी नेता तसेच त्यांचे कार्यकर्ते अशी सूचक टीका करून विरोधक आत्ताच बेताल वक्तव्य करीत आहेत तर पुढे विरोधकांची काय परिस्थिती होईल? असा तिरकस सवाल कान्हेगावचे उपसरपंच दीपक चौधरी यांनी जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांचे नाव न घेता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केला आहे.दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दीपक चौधरी यांनी पुढे असे म्हटले आहे की, आजवरच्या कोपरगाव मतदार संघाच्या इतिहासात कोपरगाव मतदार संघाचा न भूतो न भविष्यती असा विकास झाला असून कान्हेगावला देखील विकास कामांसाठी ३४ कोटी निधी मिळाला आहे.
विधानसभा निवडणुकी अगोदरच पायाखालची वाळू सरकायला सुरुवात
अविवेकी नेत्याच्या अविवेकी कार्यकर्त्यांना स्वत:च्या घरचे मत देखील पडणार नाही त्यांनी लोकप्रतिनिधींवर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. ज्याप्रमाणे कान्हेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत कोल्हे गटाला वन साईड धोबी पछाड दिले त्याप्रमाणे येणाऱ्या निवडणुकीत देखील कान्हेगावचे सुजाण मतदार आ.आशुतोष काळे यांना वन साईडच मतदान करणार आहे त्यामुळे अविवेकी नेत्याच्या पायाखालची वाळू विधानसभा निवडणुकी अगोदरच सरकायला सुरुवात झाली आहे. स्वत: बोलता येत नाही म्हणून आपल्या अविवेकी कार्यकर्त्याकडून बेताल वक्तव्य करण्याचा विरोधकांकडून केविलवाणा प्रयत्न सुरु आहे-उपसरपंच दीपक चौधरी
आपल्या कुटुंबाकडे चाळीस वर्ष सत्ता ती देखील गल्लीपासून दिल्लीपर्यंत. त्या चाळीस वर्षात जो विकास आपले कुटुंब करू शकले नाही तो विकास आ.आशुतोष काळे यांनी या पाच वर्षात करून दाखविला आहे याची सल कुठेतरी विवेकशून्य नेत्याला बोचत आहे. त्यामुळे आम्ही तुमच्या कार्यकर्त्यांच्या टीकेला मुळीच खालच्या पातळीवरची भाषा वापरणार नाही, कारण ती आमच्या नेत्याची आणि आमची देखील संस्कृती नाही मात्र त्यांना अर्धवट नेत्याचे अर्धवट कार्यकर्ते जरूर म्हणणार.कोपरगाव मतदार संघातील जनता हुशार आहे. आमच्या नेत्याचे कर्तृत्व काय आहे हे जनतेने पाच वर्षात पाहिले आहे आणि जनताच या पाच वर्षाची आणि त्या चाळीस वर्षाची तुलना करीत आहे. त्यामुळे आपण आमच्या नेत्यावर कितीही टीका करा तुमच्या टीकेने तुमची संस्कृती दिसून येईल आणि त्याच बरोबर तुम्ही आमच्या नेत्याच्या विकासासाची बरोबरी कधीच करू शकत नाही हे देखील सिद्ध होईल. ज्यांना विकासावर बोलता येत नाही त्यांच्याकडून दुसऱ्या अपेक्षा तरी काय करणार मात्र तुम्हाला विकास दिसत नसेल तर डोळ्याचा मोतीबिंदू वाढला आहे का? याची खात्री करून घ्या असा खोचक सल्ला उपसरपंच दीपक चौधरी यांनी दिला आहे.