कोल्हे गटाच्या आमरण उपोषणाला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मा.नगरसेवकांचा पाठिंबा

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगांव शहरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली असुन कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे काम राजकीय वरदहस्ताने सुरू आहे. बेकायदा रेशन विक्री, अवैध शस्त्र, बिंगो, चक्री, मटका, गांजा यामुळे तरूण पिढी चुकीच्या मार्गाला जाण्याचा धोका निर्माण झालेला आहे. कोपरगांव शहरात दहशतीचे वातावरण निर्माण करून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. संबंधीत गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करण्यात यावे व शहरात चालु असलेले अवैध धंदे तत्काळ बंद करावे यासाठी भारतीय जनता पार्टी, कोपरगांव शहर अध्यक्ष दत्तात्रय काले यांनी २ ऑक्टोंबर २०२४ पासून उपोषणास बसण्याचा जो इशारा दिलेला आहे त्यास आम्ही शिवसेना माजी नगरसेवक (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जाहीर पाठींबा देत आहोत असे पत्रक काढून जाहीर केले आहे.ऐन सणासुदीच्या काळात गोळी बारासारख्या घटना घडल्यामुळे बाजारपेठेवर याचा परिणाम होतो.नवरात्री,दीपावली असे सन समोर असताना खरेदीसाठी नागरिक येण्यास घाबरतात त्यामुळे कठोर कारवाई प्रशासनाने करावी अशी मागणी करण्यात आली आहे.माजी नगराध्यक्ष संजय सातभाई,उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, माजी नगरसेवक अतुलशेठ काले आदींनी अधिकृत पत्रकाद्वारे पाठिंबा प्रसिद्धीस दिला आहे.