गणेश कारखाना चालवितांना येणा-या अडचणीबाबत अध्यक्ष सुधीर लहारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले निवेदन

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव
श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्तांतर होवुन चालु गळीत हंगामात शेतक-यांचे केलेल्या उसाचे गाळपाचे पैसे व कामगारांचे देणे द्यावयाचे असुन निर्माण झालेल्या आर्थीक अडचणींची सोडवणुक करावी या आशयाचे निवेदन अध्यक्ष सुधीर लहारे व उपाध्यक्ष विजय दंडवते यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. शिर्डी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचाराच्यानिमीत्ताने गुरूवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोपरगांवी आले असता त्यांची गणेश कारखान्याचे अध्यक्ष व उपाध्यक्षांनी भेट घेतली. त्यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, जिल्हा बँकेचे संचालक विवेक भैय्या यांनी परिसरातील शेतक-यांच्या अडी अडचणी समजुन घेत गणेश कारखान्याच्या निवडणुकीत सत्तांतर घडवुन आणले.

तेंव्हापासुन ते आजपर्यंत गणेश कारखाना संचालक मंडळ व व्यवस्थापनांस विरोधकांकडुन सातत्यांने सापत्न वागणुक देवुन आर्थीक कोंडी करण्यांचे काम केले जात आहे त्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरूवारी भेट घेत वस्तुस्थिती निदर्शनांस आणली. चालु गळीत हंगामात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या मदतीने या परिसरातील उस उत्पादक सभासद शेतक-यांचा उस गाळप करण्यांत आला. या शेतकऱ्यांचे व कामगारांचे देणे अद्यापही बाकी आहे, त्यासाठी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेकडे कर्ज मागणी केली त्यांनी चाळीस कोटींचे कर्ज मंजूर केले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष आपल्याच पक्षाचे असून सदस्य कर्ज घेतो पुरस्कर दिले जात नाही अशी खंत अध्यक्ष सुधीर लहारे व उपाध्यक्ष विजय दंडवते यांनी शेवटी व्यक्त केली.