युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांची संजीवनी नोकरी महोत्सवाची घोषणा महोत्सवातून लवकरच हजारो तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
अलीकडे वाढत्या बेरोजगारीची समस्या कोपरगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे.कोपरगाव मतदारसंघांत शिक्षण असून नोकरी मिळत नसल्याने नैराश्य,व्यसनाधिनता, गुन्हेगारी,आत्महत्या आणि आर्थिक अस्थिरता समोर येत आहे.या समस्येचे महत्व समजून घेत संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी दहा हजार युवक युवतींना एका छताखाली थेट रोजगार मिळवून देण्यासाठी संजीवनी रोजगार महोत्सवाची घोषणा केली आहे.दिनांक ५ ऑक्टोबर २०२४ रोजी संत जनार्दन स्वामी महाराज आश्रम,भक्त निवास या ठिकाणी सकाळी ९.०० वा.पासून भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले आहे. शंभरहून अधिक कंपन्या आलेल्या तरुणांच्या मुलाखती घेणार आहेत.ज्या दिवशी मुलाखत त्याच दिवशी नोकरी हातात मिळणार आहे.ज्यांना आपल्या शैक्षणिक अर्हता नुसार नोकरी त्या दिवशी मिळणार नाही त्यांना जॉब कार्ड मिळणार असून त्यातून पुढील सहा महिने हजारो नोकरीच्या संधी व शाश्वती असणार आहे .गतवर्षी देशात जवळपास १ कोटी ३९ लाख पी एफ खाती उघडली गेली मात्र कोपरगाव तालुक्यात केवळ दहा कंपन्यांनी नवीन पी एफ खाती उघडल्याने देशाच्या तुलनेत आपण किती मागे पडलो आहोत यावर लक्ष वेधले गेले. अडीच हजारहून अधिक गुन्हे कोपरगाव शहर आणि तालुक्यात दाखल असून यातील बहुतेक आरोपी हे सुरक्षित बेरोजगार आहेत.संजीवनी उद्योग समूह,संजीवनी युनिव्हर्सिटी,कॉल सेंटर,औद्योगिक वसाहत यातून हजारो रोजगार उपलब्ध केला आहे. मात्र १८ ते ३० वयोगटातील साठ हजार पुढे संख्या असल्याने राजकीय उदासीनतेमुळे अलीकडे काही वर्षात रोजगार उभा राहू देण्यास विरोध करण्याचे काम काहींनी केल्याने युवकांचे नुकसान झाले आहे.देशात गतवर्षी १ लाख ७१ हजार आत्महत्या बेरोजगारीमुळे झाल्या.कोपरगावमद्ये गुन्हेगारी आणि व्यसनाधिनता अतिशय फोफावली आहे.यावर जर मात करायची असेल तर आपण सामूहिकरित्या सकारात्मक पावले टाकण्याची गरज आहे.आपल्याकडे जवळपास २५ हजार रोजगार आला असता मात्र दूरदृष्टी नसल्याने स्मार्टसिटी घालवण्याचे काम विरोधकांनी केल्याने तालुक्याचे नुकसान झाले. तालुक्यात एम आय डी सी उभारून नव्याने उद्योगांना उभारी देण्यासाठी सर्वप्रथम आम्ही प्रयत्न सुरू केले होते.संजीवनी युवा प्रतिष्ठानने स्वाक्षरी मोहीम राबवली व मंत्रालय स्तरावर प्रयत्न केले होते त्यामुळे श्रेय घेणारे कुणी असो आम्ही रोजगार निर्मिती होण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे विवेकभैय्या कोल्हे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.संजीवनी रोजगार महोत्सव ही सुवर्णसंधी आहे.हजारो युवक युवती यातून नव्या यशाला गवसणी घालतील.कोल्हे कुटुंबाने रोजगार निर्मितीला नेहमी प्राधान्य दिले आहे.संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सक्षमीकरण धोरण यशस्वी करण्यासाठी विवेकभैय्या कोल्हे यांनी आनंदाची घोषणा केल्याने युवा वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोपरगावच्या सुशिक्षित युवकांचे दर्जेदार कंपनीत नोकरीचे स्वप्न आता घरबसल्या साकार होणार आहे यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि कोल्हे कुटुंबीय यांचे व्हिजन चर्चेचा विषय ठरते आहे.आय.टी.,नॉन आयटी,बँकिंग,ऑटो मोबाईल, मॅन्यूफॅक्चरिंग,केपीओ ,बीपिओ, फार्मा,हॉस्पिटॅलिटी,आय.टी.आय,डिप्लोमा,सिक्युरिटी आदींसह विविध क्षेत्रातील तरुणांनी www.sanjivanijobfair.com या संकेतस्थळावर नोंदणी करून करावी असे आवाहन करण्यात आले आहे.यावेळी किरण रहाने,दीपक पवार,अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान,योगेश इंगळे आदी उपस्थित होते.