भारतीय बौध्द महासभेची कोपरगाव तालुका कार्यकारिणी जाहीर

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
भारतीय बौध्द महासभा अहिल्यानगर उत्तर विभागाची कोपरगाव तालुका कार्यकारणी पुनर्गठन बैठक अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री गौरव पवार यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर व सरचिटणीस नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा संघटक व कोपरगाव प्रभारी बिपिन गायकवाड यांनी कोपरगाव तालुका पुनर्गठन बैठकीचे आयोजन नुकतेच साईबाबा कॉर्नर येथील महात्मा गांधी चारिटेबल ट्रस्ट प्रदर्शन हॉल या ठिकाणी केले होते
यावेळी जिल्हा प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष गौतम पगारे संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष आतिश त्रिभुवन हिशोब तपासणी विजय जगताप जिल्हा संघटक व कोपरगाव तालुका प्रभारी बिपिन गायकवाड जिल्हा संघटक विश्वास जमधडे आदी जिल्हा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रथम महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करून त्रिशरण पंचशील घेऊन त्यानंतर मागील कार्यकारिणीचा कार्य अहवाल तालुकाध्यक्ष विश्वास जमधडे यांनी सादर केल्यानंतर सदरची कार्यकारणी जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर यांनी ती बरखास्त करून शांताराम रणशूर यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित तालुका पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया संस्थेच्या बायोलॉज प्रमाणे लोकशाही पद्धतीने निवड प्रक्रिया घेण्यात आली त्यानुसार विजय भातणकर (तालुका अध्यक्ष) सिद्धार्थ मेहेरखांब (सरचिटणीस) बाळासाहेब खाजेकर (कोषाध्यक्ष) सचिन खंडीझोड (उपाध्यक्ष संस्कार विभाग) अण्णासाहेब नवगिरे (उपाध्यक्ष प्रचार व पर्यटन)

सागर त्रिभुवन (उपाध्यक्ष संरक्षण) अरुण लोंढे (हिशोब तपासणी) रामनाथ लक्ष्मण जाधव (सचिव संरक्षण) गणेश भागवत निळे (सचिव संरक्षण) अजय सदाशिव विघे (संघटक) विलास छगन गवळी (संघटक) सुनील संपत खंडवे (संघटक) महेंद्र विधाते (संघटक) किरण गायकवाड (संघटक) यांची निवड प्रक्रिया जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आली यानंतर गौरव पवार यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना संस्थेच्या कामकाजाविषयी माहिती देऊन सर्वांनी एकत्रितपणे संस्थेच्या व धम्मकार्याच्या वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत तसेच निवड झालेल्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले त्यानंतर जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्याला शुभेच्छा देत असताना म्हणाले की सर्वांनी एकजुटीने एक दिलाने संस्थेच्या कुठल्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी तसेच संस्थेच्या वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे सर्वांनी पालन करून दिलेले
काम अथवा जबाबदारी सर्वांनी पूर्णत्वाकडे न्यावी असे रणशूर मार्गदर्शन करतांना शेवटी म्हणाले तसेच सर्व जिल्हा कार्यकारणी यांनी नवनिर्वाचित कोपरगाव तालुका कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिपिन गायकवाड यांनी केले तर उपस्थितांचे आभार नरेंद्र पवार यांनी मानले.