दुथडी वाहणाऱ्या गोदातीरी श्रीकृष्ण जन्माचा प्रसंग संजीवनी युवा प्रतिष्ठानने केला सादर

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केली जाणारी गंगा गोदावरी महाआरती कोपरगाव गोदावरी नदीतीरी मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाली.चौथा श्रावणी सोमवार आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्याचा योग साधत युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानने अतिशय उत्साहात साधू संतांच्या उपस्थितीत चैतन्यमय वातावरण निर्मिती केली होती.यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे आणि सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते पूजा करून संतपुजन करण्यात आले.भगवान शंकर महादेवांचा व जय श्रीकृष्णाचा जयघोष यावेळी सर्वांनी केला.महंत रमेशगीरी महाराज,महंत राघवेश्वरनंदगिरी (उंडे) महाराज,महंत शारदामाता,महंत सरलादीदी,महंत गोवर्धनगिरी,महंत कैलासगिरी,महंत विकासमहाराज, ह.भ. प लव्हाटे महाराज आदींसह मोठ्या संख्येने नागरिक,भाविक उपस्थित होते.विवेकभैय्या कोल्हे यांनी अतिशय स्तुत्य उपक्रम सुरू केला असून युवकांना आदर्श दिशेला घेऊन जाणारा विचार त्यांचा आहे.गोदावरी मातेचे पावित्र्य व आशीर्वाद आपल्याला मिळत आहे.अध्यात्मिक उपक्रम व संस्कृती जतन करन्याचे काम संजीवनी युवा प्रतिष्ठान करत आहे.श्रावण महिना आणि गोदावरी मातचे मोठे महत्व आहे.आपण भाविकांनी हा लाभ नेहमी घेत रहावा असे आशीर्वाद महंत रमेशगीरी महाराज यांनी दिले.आपल्या कोपरगाव आणि परिसराला गोदावरी समृध्द करते आहे.शेतकरी आणि नागरिकांची तहान भागवण्याचे काम गोदामाता करते.अध्यात्मिक आणि धार्मिक परंपरा जतन होणे आवश्यक आहे.विवेकभैय्या आणि त्यांचे युवा सहकारी अतिशय चांगले काम करत आहे.आमचे कोल्हे कुटुंबाचे नेहमी काम समाज सेवेचा विचार पुढे घेऊन जाण्याचे आहे.सामाजिक जाणीव जपणारे उपक्रम राबवणारे युवक ही खरी ऊर्जा आहे असे सौ.स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या.तसेच त्यांनी चारही सोमवार बोटीची मदत देत पाण्यातून फटाक्यांची आतिषबाजी करणारे मा.नगरसेवक अनिल(कालूआप्पा) आव्हाड,किरण आव्हाड,सागर पंडोरे,प्रवीण पंडोरे,किरण सिनगर,सोमनाथ आहेर,शुभम आव्हाड यांचे कौतुक केले व पोलीस प्रशासन आणि पत्रकार यांचे आभार मानले.श्रावणी सोमवार आणि गोकुळाष्टमी हा दुग्ध शर्करा योग साधून संजीवनी युवा प्रतिष्ठानने श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला.भाविकांच्या मधून डोक्यावर टोपलीत बालश्रीकृष्ण घेऊन वासुदेव हे नंद आणि यशोदा माता यांच्याकडे घेऊन जातानाचा प्रसंग सादर करण्यात आला यावेळी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.