धोत्रे ग्रामपंचायत उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या आरती जामदार यांची निवड

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या धोत्रे गावच्या उपसरपंच पदावर कोल्हे गटाच्या आरती राजेंद्र जामदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.त्यांचे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, मा.आ.सौ. स्नेहलताताई कोल्हे आणि सहकार महर्षी कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.या नवीन निवडीसाठी निरीक्षक कोल्हे कारखाना संचालक त्र्यंबकभाऊ सरोदे आणि जेष्ठ नेते शरदनाना थोरात यांच्या उपस्थितीत सर्वानुमते निवड करण्यात आली.या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सरपंच प्रदीप चव्हाण तर सहाय्यक म्हणून ग्रा. वी अधिकारी अविनाश पगारे यांनी काम पाहिले.यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच म्हणून गत कालावधीत कार्य पाहिलेले भगवान चव्हाण,भाऊसाहेब गागरे,शीतल चव्हाण,भारती जामदार,कैलास चव्हाण,मच्छिंद्र गायकवाड यांनी मोलाचे सहकार्य केले.प्रामुख्याने कोल्हे गटाला अनुकूल असणारे आणि पूर्व भागातील राजकीय दृष्ट्या महत्वाचे म्हणून धोत्रे गावाकडे पाहिले जाते.कार्यकर्त्यांचे मोठे जाळे सक्रिय असल्याने विरोधकांना थोपविण्यासाठी अशा निवडीचा अधिक फायदा कोल्हे गटाला आगामी काळात होणार आहे.यावेळी सुरेश जाधव,मनोज चव्हाण,अशोकराव गवारे,किरण चव्हाण,अरुण साळुंके,विजय जामदार,संजय जामदार,राजेंद्र जामदार,नामदेव चव्हाण,मच्छिंद्र शिंदे आदींसह ग्रामस्थ,पदाधिकारी उपस्थित होते.