अपक्ष माजी नगरसेवक मेहमूद सय्यद यांचा प्रदेशाध्यक्ष खा.सुनिलजी तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी आ.आशुतोष काळे यांच्या विचारांवर पुढील राजकीय वाटचाल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनिलजी तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी आपल्या प्रभाग क्र.११ मधील गांधीनगर परिसराचा नेत्रदीपक विकास केला आहे.त्यांना आ.आशुतोष काळे यांच्या सर्व जाती धर्माच्या समाजाला सोबत घेवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून विकास करण्याची कार्यपद्धती भावली आहे.या कार्यपद्धतीवर प्रभावित होवून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनिलजी तटकरे हे कोपरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यासाठी आले असता त्यांच्या उपस्थितीत मेहमूद शेख यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.यापुढील काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आ.आशुतोष काळे यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देवून मुस्लिम समाज एकसंघ आ.आशुतोष काळे यांच्या पाठीशी राहणार असल्याचे मेहमूद शेख यांनी यावेळी सांगितले.याप्रसंगी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ.रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम,अल्पसंख्यांक अध्यक्ष इंद्रिस नाईकवाडी, सामाजिक न्याय अध्यक्ष सुनिल मगरे,युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, दक्षिण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा,सुभाष शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी तसेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे चेअरमन,व्हा.चेअरमन सर्व संचालक मंडळ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.