कोपरगाव शहरात भरगच्च कार्यक्रमानी युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांचा वाढदिवस साजरा

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सह.साखर कारखान्याचे चेअरमन तथा संजीवनी युवा प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कोपरगाव शहरात विविध भागात महिला भागीणींनी औक्षण करीत भरगच्च कार्यक्रमात वाढदिवस मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला. कोपरगाव शहरातील शिंगणापूरातील संजीवनी गेट, दत्तमंदिर, बागुल वस्ती, शारदानगर, खडकी, बाबा चौक, मोहिनीराजनगर, क्रांतिचौक, गजानननगर, इंदिरानगर, साईनगर, तुळजाभवानी मंदिर बाजार तळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, आदीसह ठिकाणावर जाऊन विवेक कोल्हे यांनी कार्यकर्ते व मित्र परिवाराचे सत्कार घेतले भव्य अशी रॅली काढली होती.

तालुक्यातील हजारो तरुण या मध्ये शुभेच्छा देण्यासाठी सहभागी झाले होते. शेकडो वाहनांचा ताफा सोबत होता.याप्रसंगी अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान,भाजपाचे शहराध्यक्ष डी. आर. काले, भाजयुमोचे अध्यक्ष सिद्धार्थ साठे,माजी नगराध्यक्ष संजय सातभाई,रवींद्र पाठक योगेश बागुल, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,विजय वाजे, दीपकराव वाजे, आकाश वाजे, जितेंद्र रणशूर, कालू अप्पा आव्हाड, सतीश काकडे, रोहित वाघ, कैलास सोमासे, रोहित कनगरे, सतीश त्रिभुवन, दादाभाऊ नाईकवाडे, जनार्दन कदम, दादू काकडे, सोमनाथ म्हस्के, फिरोज पठाण, महेश दुशिंग, आशिष निकुंभ, मयूर लचुरे, योगेश अमृतकर, दीपक जपे, दिलीप सोनवणे, रवी रोहमारे, विजय चव्हाणके, आदीसह कार्यकर्त्यांनी सत्कार केले.