आर्थिक स्वावलंबनामुळेच महिला सक्षमीकरण होऊ शकते-मा.प्रशांत वाबळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
भारतात सर्वात जास्त महिला कर्मचारी एल.आय.सी.या संस्थेत आहेत. त्या कुटुंबाचा आधार आहेत. या महिला कुटुंबाला मदत करतात एल.आय.सी ही संस्था विमा सखी योजना महिला सक्षमीकरणासाठी मदत करते, महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी अभ्यासाबरोबरच विमा सखी योजनेत काम करून स्वतः आर्थिक स्वावलंबन करावे कारण सर्वात जास्त रोजगार मिळवणाऱ्या संधी वाणिज्य व कला शाखेत उपलब्ध आहेत. आज अनेक प्रकारच्या करिअरच्या संधी या शाखेमध्ये उपलब्ध आहे. असे प्रतिपादन एल.आय.सी.ऑफिसर प्रशांत वाबळे यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथील ‘सखी सावित्री’ आणि ‘महिला सबलीकरण समिती’अंतर्गत “व्यक्तिमत्त्व विकास ” या विषयावर शुक्रवार,दि.७ फेब्रुवारी २०२५ रोजी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त ते बोलत होते.प्रमुख अतिथी गौरव रत्नपारखी यांनी युवा सखी योजनेची सविस्तर माहिती देताना, “विमा योजना तळागाळापर्यंत पोहोचली नाही ती पोहोचणे आवश्यक आहे”. असे प्रतिपादन केले. तसेच महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा. गोरक्ष नरोटे यांनी, “व्यक्तिमत्त्वासाठी तीन घटक महत्त्वाचे असून इहम,अहंम,परमाहंम या संकल्पना स्पष्ट करताना विचारांमध्ये परिवर्तन केले तर भावनाही बदलतात आणि त्यानुसार वर्तन घडते.”

असे सांगितले.अध्यक्षीय मनोगतात विज्ञान शाखेचे उपप्राचार्य प्रा.डॉ.मोहन सांगळे यांनी, “ महिला बचत गट, महिला सक्षमीकरण, उज्वल योजना, सुकन्या समृद्धी योजना, प्रधानमंत्री मातृवंदन योजना, बेटी बचाव बेटी पढाव अभियान, महिला हिंसाचार विरोधी हेल्पलाइन इ. योजना सांगून महिला सक्षमीकरणाचे फायदे सांगताना आर्थिक स्वातंत्र्य, शिक्षणाचा प्रसार, कौशल्य वृद्धी, सामाजिक समानता, हिंसाचाराचा प्रतिबंध या गोष्टींचाही परिचय करून दिला. तसेच महिलांना सन्मान, समान संधी व व्यक्तीस्वातंत्र्य मिळाल्यास समाजाची एकात्मता वाढीस लागेल असे आवर्जून सांगितले. त्याचबरोबर महिलांनी स्वतःला सक्षम बनवण्यासाठी शिक्षण घेणे, सरकारी योजनांचा लाभ घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.” असे सांगितले.
यावेळी सदर कार्यक्रमासाठी प्रा.डॉ. उज्ज्वला भोर, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत, डॉ.वैशाली सुपेकर, प्रा.अश्विनी पाटोळे, डॉ.वंदना घोडके यांसह महाविद्यालयातील महिला प्राध्यापक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य संजय शिंदे यांनी केले. तर सूत्रसंचालन डॉ.सीमा दाभाडे व आभार प्रा. सौ.एस.एस. दिघे यांनी मानले.