कोपरगाव शहर पोलिसांची दमदार कामगिरी 8 लाख 70 हजार रुपये किमतीच्या गोवंश मांसा सह 2 आरोपी केले जेरबंद

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव
कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल दिगंबर शेलार हे शनिवार दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी रात्री 11 वाजून 45 वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्ग टोलनाक्या जवळ आपली ड्युटी बजावत असतांना टाटा कंपनीची इंट्राव्ही 30 टेम्पो नंबर एम एच 43 बी एक्स 8785 या टेम्पो मध्ये विनापरवाना गोवंश जातीच्या जनावरांचे गोमांस वाहतूक करताना सदर टेम्पो मिळून आला या टेम्पो मध्ये 1700 किलो गोवंश जातीच्या जनावरांचे मास त्याची आजच्या बाजार भावानुसार किंमत होते

2 लाख 70 हजार रुपये व सदरचा टेम्पो त्याची किंमत 6 लाख रुपये अशी 8 लाख 70 हजार रुपये किमतीचा माल कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल दिगंबर शेलार यांनी जप्त करून पोलीस स्टेशनला हजर केला त्यातील आरोपी मोहम्मद कैफ शरीफ कुरेशी वय 20 राहणार कुर्ला मुंबई तसेच दुसरा आरोपी रिजवान मलंग कुरेशी वय 36 राहणार कुर्ला मुंबई यांना कोपरगाव शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्यावर कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये 213/2024 महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 176 चे कलम 5, 9, 11 भा.द.वि कलम 188, 279, 271, 34 प्रमाणे साथ रोग अधिनियम 1897 ची कलम 3,4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल के.ऐ. जाधव हे करत आहे.