संजीवनी कार्यस्थळावर कृभको अंतर्गत सहकार सक्षमीकरण मोहिम संपन्न

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव तालुक्यातील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर कृषक भारती को. ऑपरेटिव्ह लि. नविदिल्ली- कृभको व सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाच्यावतीने सहकार सक्षमीकरण मोहिम संपन्न झाली. अध्यक्षस्थानी कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे होते.प्रारंभी सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करण्यांत आले. सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष अंबादास देवकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उपाध्यक्ष बाजीराव मांजरे यांनी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली संघाने आजवर केलेल्या प्रगतीचा आढावा सांगितला. याप्रसंगी युवा शेतकरी सचिन दत्तात्रय कोल्हे, पराग संधान, दत्तात्रय मोरे यांचा सत्कार करण्यांत आला. कृभको फिल्ड मॅनेजर सुदर्शन पाटील यांनी प्रास्तविक केले. पुणेचे विभागीय व्यवस्थापक शंकरराव शेंडगे यांनी कृभको अंतर्गत शेतक-यांसाठी राबविल्या जाणा-या विविध योजनांची माहिती दिली.कृभकोचे राज्य विपणन प्रबंधक बिपीन चव्हाण याप्रसंगी बोलतांना म्हणांले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी सहकार क्षेत्रात अमुलाग्र बदल केले असुन ग्रामिण भागातील शेतक-यांना शेतीबरोबरच सहकारी सोसायटीच्या माध्यमांतुन सुमारे १५० प्रकारच्या विविध व्यवसायातुन शाश्वत आर्थीक स्रोत उत्पन्न होवु शकतात त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. कृभकोचे देशात ९ हजार ६५० सभासद असुन ५ हजार ३०० कोटींची वार्षीक उलाढाल आहे.

कृभकोने आजवर शेतक-यांना निमकोटेड युरिया, जैविक खते, डीएपी, एनपीके, ट्रीपल सुपर फॉसपेटचा पुरवठा करून दर्जेदार बी-बीयाणेही पुरवीले आहे. कोपरगाव येथे खत रेक पॉइंट सुरु केला, शेतक-यांनी अधिक पीक उत्पादनासाठी वेळच्यावेळी माती पाणी परिक्षण करून ज्या पोषकद्रव्यांची आवश्यकता आहे त्याबाबत वेळोवेळी काळजी घ्यावी असे ते म्हणाले.आयाप्रसंगी कोपरगाव सहाय्यक निबंधक एन.जी. ठोंबळ व आर एन रहाणे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सर्वश्री. विश्वासराव महाले, त्रंबकराव सरोदे, निवृत्ती बनकर, मनेष गाडे, रमेश घोडेराव, ज्ञानेश्वर परजणे, सतिष आव्हाड, विलासराव माळी, सोपानराव पानगव्हाणे, बाळासाहेब पानगव्हाणे, विलासराव वाबळे, मोहनराव वाबळे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव जी. सुतार, प्रकाश सांगळे, बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम, सचिन कोल्हे, दत्तात्रय मोरे, बबनराव निकम, संभाजीराव गावंड, नानासाहेब थोरात, रावसाहेब थोरात, प्रभाकर बढे, चंद्रकांत देवकर, रामदास शिंदे, विठ्ठलराव कोल्हे, शिवाजीराव कदम, अशोक रामनाथ जाधव, प्राथमिक पतपुरवठा व सहकारी सोसायटीचे सर्व संचालक यांच्यासह विविध संख्यांचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद, शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. आभार विश्वासराव महाले यांनी मानले. सुत्रसंचलन हरिभाऊ गोरे व भिवराज जावळे यांनी केले.