आदिवासी भगिनीने आ.आशुतोष काळेंचे औक्षण करून बांधली राखी

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
आपला भारत देश ही सणांची भूमी आहे येथे प्रत्येक ऋतूत सण साजरे केले जातात कारण त्यामागे थोर परंपरा आहे. आपल्या सणांमध्ये केवळ उत्सवाचा आनंद नसतो, तर त्यामागे दडलेली मूल्यं, आपुलकी, सामाजिक एकोपा आणि नात्यांतील गुंतवणूकही असते. आपली संस्कृती ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वावर आधारलेली असून याचा अर्थ ‘सारा समाज एक कुटुंब’ असा होतो.रक्षाबंधन हा सण देखील असाच भावनिक नात्यांचा सण आहे. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते आणि त्याच्या यशस्वी आणि सुरक्षित आयुष्याची प्रार्थना करते, तर भाऊ तिच्या रक्षणाचं वचन देतो. हा केवळ एका नात्याचा उत्सव नाही, तर प्रेम, सन्मान, आणि कुटुंबातल्या अतूट बंधनांचं प्रतीक आहे.याच पवित्र परंपरेला कोपरगाव शहरात अधिक अर्थपूर्ण आणि हृदयस्पर्शी वळण मिळालं, जेव्हा जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात आदिवासी भगिनीने आमदार आशुतोष काळे यांचे औक्षण करून त्यांना राखी बांधली. या सोहळ्याच्या वेळी उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती क्षणभर भावनाविवश झाला होता. राखीच्या त्या नाजूक दोऱ्यात गुंफले होते नात्याचं सौंदर्य, विश्वासाचं बळ आणि बंधुत्वाचं अमरत्व. आदिवासी संस्कृतीतील सात्त्विकता आणि परंपरेची गंधमय छाया त्या औक्षणात दिसून येत होती.

आ.आशुतोष काळे यांनी त्या लाडक्या भगिनीची राखी स्वीकारतांना त्यांना देखील आपल्या डोळ्यांतील कृतज्ञतेचा भाव लपवता आला नाही. हा रक्षाबंधन सोहळा फक्त भाऊ-बहिणीच्या नात्याचा नव्हता, तर तो समाजातील एकोपा, समरसता आणि माणुसकीचा विजय होता. आदिवासी भगिनीच्या हातून आलेली राखी म्हणजे त्या समाजाच्या प्रेमाची, आपुलकीची आणि विश्वासाची साक्ष होती.हे रक्षाबंधन केवळ राखी बांधण्यापुरते नव्हते तर हे रक्षाबंधनाने एक सामाजिक संदेश दिला प्रेम, आदर आणि बंध ही माणुसकीची खरी ओळख आहे आणि आपल्यातल्या एकात्मतेचा, समतेचा आणि प्रेमाचा साज आहे . औक्षणाचा तो क्षण केवळ एक परंपरा नव्हती, तर तो एक भावनिक स्पंदन होता जिथे आदर, आपुलकी आणि आत्मीयता यांचा संगम होता.आदिवासी भगिनीच्या त्या अलंकारिक औक्षणाने आणि राखीने एक नवा विश्वास, एक नवे बंध निर्माण केले जे काळाच्या कसोटीतही अखंड राहणार आहे.