आ.आशुतोष काळेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नागरीकांची मोठी गर्दी

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आशुतोष काळे सोमवार (दि.०४) रोजी वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी महात्मा गांधी जिल्हा चॅरीटेबल ट्रस्ट प्रदर्शन हॉल कोपरगाव येथे उपस्थित होते. सकाळी दहा वाजल्यापासून शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांचा सुरु झालेला प्रचंड ओघ सायंकाळी पाच वाजे पर्यंत अखंडपणे सुरु होता.कोपरगाव शहरासह तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या कार्यकर्त्यांनी आ.आशुतोष काळे यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. युवावर्ग, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, व्यापारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने व मोठ्या उत्साहात शुभेच्छा देण्यासाठी रांगेत उभे होते.

यावेळी एवढी गर्दी असतांना देखील शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीशी आ.आशुतोष काळे हस्तांदोलन करून त्यांचे आभार मानत होते. त्यावेळी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावरील उत्साह ओसंडून वाहत होता.आ.आशुतोष काळे यांनी सकाळी शिर्डी येथे जावून श्री साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन आरती केली व साई बाबांना शाल अर्पण करून आशीर्वाद घेतले. तसेच राष्ट्रसंत संत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज यांच्या समाधीचे व प.पु.रमेशगिरीजी महाराज यांचे दर्शन घेवून आशीर्वाद घेतले.