Breaking
आमदार आशुतोष काळे उद्योग समूह

पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार पतसंस्थेने सभासदांचा आणि ठेवीदार व ग्राहकांचा विश्वास संपादन केला – आ. आशुतोष काळे

३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न, सभासदांना याहीवर्षी १५% लाभांश

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

सहकारी संस्था म्हणजे केवळ आर्थिक व्यवहाराचे केंद्र नव्हे तर समाजाच्या आर्थिक सामाजिक आणि नैतिक उन्नतीचे माध्यम आहे. सहकारी संस्था खऱ्या अर्थाने सभासदांच्या विश्वासावर उभ्या असतात. त्यामुळे संस्था सक्षम आणि यशस्वी व्हायच्या असतील, तर त्या काटकसरीने, पारदर्शकतेने व शिस्तबद्ध पद्धतीने चालवाव्या लागतात तरच सभासदांचा आणि ठेवीदारांचा संस्थेवरचा विश्वास वृद्धिंगत होतो. पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार पतसंस्थेने कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या आदर्श विचारांना दृष्टीआड न होवू देता पारदर्शकतेच्या आणि विश्वासार्हतेच्या मूल्यांवर आधारित सेवा पुरवून सभासदांचा आणि ठेवीदार व ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे असे गौरवोद्गार आमदार आशुतोष काळे यांनी काढले. पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेच्या २०२४-२५ या वर्षाची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गौतम बँकेच्या गौतमनगर येथील मुख्य कार्यालयाच्या सभागृहात शनिवार दि.०२ रोजी संस्थेचे आधारस्तंभ माजी आमदार अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

जाहिरात
जाहिरात

यावेळी सभासदांना मार्गदर्शन करतांना आ.आशुतोष काळे बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन देवेंद्र रोहमारे होते.यावेळी पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, सहकारी संस्था म्हणजे केवळ व्यवस्थापन नव्हे, तर विश्वासाचे आणि कर्तव्यनिष्ठेचे एक जिवंत रूप आहे. सभासदांचा पैसा ही एक मोठी जबाबदारी आहे. तो खर्च करताना प्रत्येक संस्थेने अनावश्यक खर्च टाळल्यासच संस्थेचा आर्थिक पाया भक्कम राहतो. पतसंस्थेची वाटचाल अत्यंत उल्लेखनीय असून, ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या दृष्टीने ही संस्था मोलाचे कार्य करत आहे. संस्थेची पारदर्शक कारभारपद्धती, आर्थिक शिस्त आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे ग्रामीण भागातील लोकांचा विश्वास संस्थेवर अधिकाधिक दृढ होत आहे हि अतिशय समाधानाची बाब आहे. संस्थेच्या दोन शाखा असून दोन्ही शाखा प्रगतीपथावर आहे.संस्थेच्या ठेवीमध्ये सातत्याने वाढ होत असून आज संस्थेकडे ४७ कोटीच्या ठेवी आहेत. अहवाल सालात संस्थेने २८ कोटी ६८ लाख कर्ज वाटप केलेले आहे. संस्थेची कर्ज वाटपाचे श्रेय कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूहातील कर्मचारी, सभासद बंधू तसेच परिसरातील छोटे-मोठे व्यावसायिक यांनाच आहे. संस्थेचे थकबाकीचे प्रमाण २.३४% आहे.

एनपीए च्या व्याज व मुद्दलासाठी ०८ कोटी ४५ लाख ९९ हजाराची गुंतवणूक केली असून १००% तरतुदीमुळे निव्वळ एन.पी.ए.०% आहे.लेखा परीक्षण अहवालानुसार संस्थेला ऑडीट वर्ग ‘अ’ मिळाला असून ०१ कोटी ०१ लाख २४ हजार रुपयांचा नफा होवून पतसंस्था आर्थिक प्रगतीच्या दिशेने भक्कमपणे मार्गक्रमण करीत आहे. त्याबद्दल संस्थेचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांचे आ.आशुतोष काळे यांनी कौतुक केले व सभासदांना याहीवर्षी १५% लाभांश देण्याचे जाहीर केले.अहवाल वाचन संस्थेचे मुख्य व्यवस्थापक मंगेश देशमुख यांनी केले. यावेळी सर्वच्या सर्व १ ते १३ विषय सभासदांनी एकमताने टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आले. याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण, संचालक दिलीपराव बोरनारे, सचिन चांदगुडे, अनिल कदम, सुभाष आभाळे, प्रशांत घुले, मनोज जगझाप, श्रीराम राजेभोसले, श्रावण आसने, डॉ.मच्छिंद्र बर्डे,

जाहिरात

तसेच ज्येष्ठ नेते छबुराव आव्हाड, विश्वासराव आहेर, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, गौतम सहकारी कुक्कुट पालनचे व्हा.चेअरमन विजयराव कुलकर्णी,गौतम बँकेचे माजी चेअरमन बाबासाहेब कोते, पंचायत समितीचे मा.सभापती अर्जुनराव काळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, शरद पवार पतसंस्थेचे चेअरमन देवेंद्र रोहमारे, बँकेचे व्हा.चेअरमन सुनील डोंगरे, सर्व संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे, प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुड, कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद, पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार पतसंस्थेचे मुख्य व्यवस्थापक मंगेश देशमुख, गौतम सहकारी कुक्कुट पालनचे मॅनेजर सुरेश पेटकर, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट चे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे आदी मान्यवरांसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »