आमदार आशुतोष काळे उद्योग समूह

दादासाहेब साबळे यांचा सेवापुर्ती निमित्त सपत्नीक सत्कार संपन्न

0 6 0 5 5 1

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील रहिवासी दादासाहेब चंद्रकांत साबळे हे भारतीय डाक सेवेतून ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून ग्रामीण डाक सेवक म्हणून नुकतेच सेवानिवृत्त झाले त्यानिमित्ताने कोपरगाव डाक विभागाच्या वतीने व भारतीय बौध्द महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने साईबाबा कॉर्नर येथील महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट प्रदर्शन हॉल मध्ये सत्कार समारंभाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष दादा काळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगाव भारतीय डाक विभागाचे डाक निरीक्षक अनंत सोनवणे व कोपरगाव डाक विभागाचे सब पोस्टमास्टर राजेश नेतनकर तसेच गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश आबा परजणे व भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज तथागत भगवान गौतम बुध्द छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर आमदार आशुतोष दादा काळे यांच्या हस्ते सेवानिवृत्त दादासाहेब साबळे व हिराबाई साबळे यांचा फेटा शाल श्रीफळ गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर नानासाहेब साबळे यांनी आमदार आशुतोष दादा काळे यांची महाराष्ट्र राज्याच्या युवा धोरण समितीच्या सदस्य पदी व महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे मराठी भाषा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल फेटा शाल देऊन सत्कार करण्यात आला

त्यानंतर पत्रकार बिपिन गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले

त्यानंतर आमदार आशुतोष दादा काळे राजेश आबा परजणे कार्यक्रमाचे अध्यक्ष अनंत सोनवणे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहम कोपरगाव तालुका जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार एस.जी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक रमेश गवळी महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब जपे सेवानिवृत्त पोस्टमास्तर राजेंद्र नानकर पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुन काळे बौध्दाचार्य विजय जगताप बाबासाहेब पगारे दादासाहेब धीवर मच्छिंद्र खरात गणेश त्रिभुवन बाळासाहेब बारहाते पत्रकार सिद्धार्थ मेहेरखांब वैजापूरचे यशवंत पडवळ यांच्यासह अनेकांची मनोगते व्यक्त झाली सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र मेहेरखांब सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रसाद साबळे यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 5 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे