एस.एस.जी.एम महाविद्यालयात कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन संपन्न

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव महाविद्यालयातील करिअर कौन्सिलिंग आणि प्लेसमेंट सेल, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक सायन्स, संगणक विज्ञान विभाग,आय.क्यू.ए.सी. व “डायरेक्टोरेट ऑफ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज मुंबई” या विभागाच्या संयुक्त विद्यमाने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन केलेले होते.

सदर मुलाखतीसाठी डायरेक्टोरेट ऑफ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज मुंबई यांच्या वतीने सी.एम.एस.कॉम्प्युटर्स तर्फे योगेश बिरमोळे,जितेंद्र शिंत्रे आणि अतुल कुमार या तज्ञांची समिती आली होती. या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये एकूण १३४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे यांनी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सदर उपक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम भगत यांनी केले. तर करियर कौन्सिलिंग आणि प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा.दिलीप भोये यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.अरुण देशमुख यांनी विशेष प्रयत्न केले.