चार नं.साठवण तलाव कॉंक्रीटिकरणाचे काम हाती घ्या आ.आशुतोष काळेंच्या मुख्याधिकाऱ्यांना सूचना

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
पाच नंबर साठवण तलावाच्या निर्मिती झाल्यापासून कोपरगाव शहरातील नागरीकांना नियमितपणे तीन दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. परंतु पुढील पन्नास वर्षाचे नियोजन करण्याच्या दृष्टीने मोठे क्षेत्रफळ असणाऱ्या चार नंबर साठवण तलावाची साठवण क्षमता वाढविणे काळाची गरज आहे. त्यासाठी चार नंबर साठवण तलावाच्या कॉंक्रीटिकरणाचे काम हाती घ्या अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास जगताप यांना दिल्या आहेत.कोपरगाव शहरातील नागरीकांची तहान भागविण्यात कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणारे एक ते चार साठवण तलाव असमर्थ ठरले होते. कोपरगाव शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत पाणी आरक्षित असतांना देखील साठवण क्षमता नसल्यामुळे कोपरगाव शहरातील नागरीकांना आठ दिवापासून ते कधी एकवीस दिवसांनी पाणी पुरवठा होत होता. परंतु आ. आशुतोष काळे यांनी कोपरगावच्या जनतेला पाणी प्रश्न सोडविण्याचा दिलेला शब्द पूर्ण करून पाच नंबर साठवण तलावाचे काम पूर्ण झाल्यांनतर कोपरगावकरांना नियमितपणे तीन दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. कित्येक दशकापासूनचा पिण्याच्या पाण्याचा सुटलेला प्रश्न व कोपरगाव शहरातील रस्त्यांचा झालेला विकास व इतरही विकास कामांमुळे शहरातील बाजारपेठेवर सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

परंतु भविष्यकाळाचा विचार करता यावरच थांबणे योग्य नाही.पाणी पुरवठा करणाऱ्या एक ते तीन साठवण तलावाचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु त्याचबरोबर कोपरगाव शहरात होणाऱ्या एमआयडीसीमुळे वाढणारी लोकसंख्या गृहीत धरून कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचे आरक्षण आ.आशुतोष काळे यांनी मंजूर करून घेतलेले आहे. त्यामुळे मंजूर असलेले पाणी वेळच्या वेळी उचलले जाणे गरजेचे असून त्यासाठी साठवण क्षमता वाढविणे देखील तेवढेच गरजेचे आहे. त्यामुळे कोपरगावच्या नागरीकांना नियमितपणे तीन दिवसाआड पाणी पुरवठा सुरळीतपणे सुरु राहणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर चार नंबर साठवण तलावाच्या कॉंक्रीटिकरणाचे काम हाती घेणे गरजेचे असून चार नंबर साठवण तलावाच्या कॉंक्रीटिकरणाचे कामासाठी प्रस्ताव तयार करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास जगताप यांना दिल्या आहेत.