कोळ नदीवरील बंधारा भरला नागरीकांनी जलपूजन करून मानले आ.आशुतोष काळेंचे आभार

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गोधेगाव-घोयेगाव, धोत्रा, आपेगाव, तळेगाव आदी गावातील शेतकऱ्यांसाठी वरदान असलेला गोधेगाव-घोयेगावच्या कोळ नदीवरील बंधारा गोदावरी डाव्या कालव्याच्या माध्यमातून भरला असून त्याबद्दल लाभार्थी गावातील शेतकऱ्यांनी व नागरीकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानून बंधाऱ्याच्या पाण्याचे विधिवत पूजन केले आहे. चालू वर्षीच्या तीव्र उन्हामुळे भू-गर्भातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागात देखील काही प्रमाणात पाणी टंचाई जाणवत असल्यामुळे नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे गोदावरी डाव्या कालव्याला सुरु असलेल्या उन्हाळी आवर्तनातून गोधेगाव-घोयेगावच्या कोळ नदीवरील बंधारा भरून मिळावा अशी मागणी गोधेगाव, घोयेगाव, धोत्रा, आपेगाव, तळेगाव आदी गावातील शेतकऱ्यांनी व नागरीकांनी आ.आशुतोष काळे यांचेकडे केली होती. त्या मागणीची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याबाबत सूचना करून डाव्या कालव्यातून गोधेगाव-घोयेगावच्या कोळ नदीवरील बंधाऱ्यात पाणी सोडण्याच्या सूचना केल्या होत्या.

त्या सूचनेनुसार कोळ नदीवरील बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले असून हा बंधारा रविवार (दि.१८) रोजी पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्याचा फायदा गोधेगाव-घोयेगाव, धोत्रा, आपेगाव, तळेगाव या गावातील ग्रामपंचायत विहिरी, शेतकऱ्यांना होणार असून भू-गर्भातील पाणी पातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे. या बंधाऱ्याच्या पाण्याचे गोधेगाव, घोयेगाव, धोत्रा, आपेगाव, तळेगाव आदी गावातील शेतकऱ्यांनी व नागरीकांनी रविवार रोजी पूजन केले आहे.आ. आशुतोष काळे यांच्या मुळे २०१९ पासून सातत्याने गोधेगाव-घोयेगावच्या कोळ नदीवरील बंधारा भरत आहे. याहीवर्षी हा बंधारा भरल्यामुळे शेतकरी व नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून पूर्व भागातील गोधेगाव-घोयेगाव, धोत्रा, आपेगाव, तळेगाव आदी गावातील शेतकऱ्यांनी व नागरीकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.