सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
तंत्रज्ञान वेगाने विकसीत होत असल्याने सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाला बदलत्या परिस्थीतीत थेट शेतकऱ्यांना घरपोहोच सेवा देऊन काळानुरूप पावले टाकावे लागतील असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले. शेतकरी केंद्रस्थानी ठेवून त्याच्या प्रगतीत सातत्याने भर घालावी लागेल असेही ते म्हणाले.सहकाररत्न शंकरराव कोल्हे कोल्हे शेतकरी सहकारी संघाची ८९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी कोपरगांव येथे पार पडली त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरुन बोलत होते. प्रारंभी संघाचे अध्यक्ष अंबादास देवकर यांनी उपस्थीतांचे स्वागत केले, उपाध्यक्ष वेणुनाथ मांजरे यांनी अहवाल सालात दिवंगत झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली, विषय पत्रिकेवरील सर्व विषय टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आले. व्यवस्थापक आर. एन. रक्ताटे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम केले.

बिपीनदादा कोल्हे पूढे म्हणाले की, अॅमेझॉन, फिल्पकार्ट आदि कंपन्या ऑनलाईन पद्धतीने थेट ग्राहकापर्यंत माल पुरवितात; त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी बदलत्या परिस्थीतीत निर्माण होणाऱ्या स्पर्धेसह आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शेतकरी सहकारी संघास सतत पाठबळ दिले. आधुनिक तंत्रज्ञानाचा बदल आत्मसात केला, जागतिक स्तरावरील बदलांचा अभ्यास करून त्यानुसार ध्येयधोरणे ठरवण्यात इफकोचे संचालक विवेक कोल्हे हे देखील पुढाकार घेतात. आपला संघ हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत कमी नफा घेऊन् शेतीविषयक साधने, किटकनाशके खते, द्रोन आदि साहित्य पुरवीत आहे. आजपर्यंत आपण कधीही कुणाची फसवणुक केलेली नाही. कृषी विषयक उत्पादनाची विक्री किंमत कमी दाखवून त्यावर दूसरे उत्पादन शेतकऱ्यांच्या गळ्यात मारण्याचे प्रकार सध्या सर्रास सुरू आहे. सहकार हा सर्वांच्या प्रगतीसाठी असून एकमेकांना बरोबर घेत प्रगतीची शिखरे गाठायूची असतात. संघाची प्रगती ही सभासद शेतकऱ्यांवरच अवलंबून आहे. सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाने ८९ वर्षात येथील शेतकरी सभासदांच्या उत्कर्षात मोलाचे स्थान देत आहे.

यावेळी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे, साई संजीवनी बँकेचे अध्यक्ष शरद थोरात, विश्वासराव महाले, अरुण येवले, शिवाजीराव वक्ते, मनेष गाडे, सतीश आव्हाड, डॉ. गुलाबराव वरकड, अप्पासाहेब दवंगे, ज्ञानदेव औताडे, बाळासाहेब वक्ते, ज्ञानेश्वर परजणे, मच्छिंद्र लोणारी, राजेंद्र परजणे, प्रदीप नवले, रमेश औताडे, शेतकरी सहकारी संघाचे संचालक संभाजीराव गावंड, प्रकाश सांगळे, विलास कुलकर्णी, बबनराव निकम नानासाहेब थोरात, रावसाहेब थोरात, विठ्ठल कोल्हे, रामदास शिंदे, रघुनाथ फटांगरे, देविदास हुडे, हिरालाल गायकवाड, प्रमिला बडे, ताई लोंढे यांच्यासह विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी सभासद शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते, भिवराज जावळे यांनी सूत्रसंचालन केले. शेवटी उपाध्यक्ष वेनुनाथ मांजरे यांनी आभार मानले.