आमदार आशुतोष काळे उद्योग समूह

महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथ यात्रेचे शिर्डी-कोपरगाव मध्ये आ.आशुतोष काळेंनी हजारो कार्यकत्यांसह मोठ्या उत्सवात केले स्वागत

0 5 5 2 1 6

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

राज्यात प्रथमच राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने संपूर्ण राज्यात संयुक्त महाराष्ट्राच्या ६५ व्या वर्ष स्थापना दिनानिमित्ताने महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथ यात्रा काढण्यात आल्या असून मुंबई येथे १ मे रोजी गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हि महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथ यात्रा शिर्डी-कोपरगाव येथे आली असता आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव व शिर्डी मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या यात्रेचे स्वागत केले.राज्याच्या जडण घडणीत अजोड योगदान देणाऱ्या थोर व्यक्तींच्या कार्याची आठवण म्हणून महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे ते ४ मे दरम्यान मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने ‘गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचे’ भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात ‘महाराष्ट्र गौरव’ मंगल कलश रथ यात्रा काढण्यात आली आहे. या मंगल कलश रथ यात्रेत महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातील महापुरुषांच्या वास्तव्याने समृद्ध झालेल्या प्रदेशांतील माती व पाणी मंगल कलशांमध्ये एकत्रित करण्यात येत आहे. हि मंगल कलश यात्रा बुधवार (दि.३०) रोजी शिर्डी-कोपरगावमध्ये आली असता आ.आशुतोष काळे यांनी ‘महाराष्ट्र गौरव’ मंगल कलश रथ यात्रेचे स्वागत केले.यावेळी कोपरगाव व शिर्डी येथील विविध धार्मिक स्थळांच्या भूमीतील पवित्र माती व पवित्र जल या मंगल कलशामध्ये अर्पित करण्यात आले.यामध्ये गोदावरी, प्रवरा व मुळा नदीचे पवित्र जल तसेच श्री साईबाबा मंदिर शिर्डी व कोपरगाव तालुक्यातील ओम गुरुदेव विश्वात्मक जंगलीदास महाराज आश्रम, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज मंदीर, दैत्य गुरु शुक्राचार्य व संत जगनाडे महाराज मंदिर कोपरगाव या ठिकाणची पवित्र माती मंगल कलशामध्ये भरून शिर्डी शासकीय विश्राम गृह ते श्री साईबाबा मंदिर परिसरापर्यंत टाळ मृदुंगांच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत आ.आशुतोष काळे स्वत: कलश हातात घेवून मिरवणुकीत सहभागी झाले. शिर्डी येथील श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेवून हे कलश आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते मंगल कलशात अर्पण करण्यात येवून ‘महाराष्ट्र गौरव’ मंगल कलश रथ यात्रा पुढील प्रवासासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाली.याप्रसंगी बोलतांना आ.आशुतोष काळे पुढे म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर संयुक्त महाराष्ट्राच्या ६५ व्या वर्ष स्थापना दिनानिमित्ताने महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथ यात्रा काढण्यात आल्या आहेत.

जाहिरात
जाहिरात

या निमित्ताने आपल्या महाराष्ट्राची परंपरा व जगावेगळी असलेली संस्कृती जपण्याचा व आपल्या वैभवशाली इतिहासातून या भूमीच्या महापुरुषांचा वारसा पुढे घेवून जाण्याचा उद्देश सार्थ होवून महाराष्ट्राचा अमृत कलश असाच पुढे पुढे जात राहील असे त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रविंद्र पाटील, विद्यार्थी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, मा.आ.लहु कानडे, शिर्डी लोकसभा कार्याध्यक्ष अशोक कानडे, युवक जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव, बाबासाहेब कोते, कोपरगाव राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, शहराध्यक्ष सुनील गंगुले, युवक अध्यक्ष नवाज कुरेशी,कार्याध्यक्ष संतोष चवंडके,रमेश गवळी, बाळासाहेब रुईकर, अशोक आव्हाटे, डॉ.कुणाल घायतडकर, प्रकाश दुशिंग, आकाश डागा, अॅड.मनोज कडू, युवक तालुकाध्यक्ष शशिकांत देवकर, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,राहाता तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व सलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक मंडळ, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती,संचालक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक,आदींसह शिर्डी व कोपरगाव व राहाता मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 5 2 1 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे