नव्या पिढीच्या जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी -उपराष्ट्रपती जगदीप धनखड

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राज्यातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये संविधान मंदिराचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने केले यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले की भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असून भारतीय राज्यघटना ही सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे राज्यघटनेबाबत नव्या पिढीत जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्या मधील ४३४ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये संविधान मंदिर लोकार्पण सोहळा उपराष्ट्रपती यांच्या हस्ते पार पडले यावेळी उपराष्ट्रपती म्हणाले की भारतीय संस्कृतीचे सार आपल्या संविधानात सामावले आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मितीत खूप मोठे योगदान आहे भारतीय राज्यघटना सर्वात आणि वैशिष्ट्यपूर्ण असून राज्यघटनेचा गाभा आपण समजून घेणे गरजेचे आहे वंचितांच्या विकासासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर परिश्रम घेतले सामाजिक न्याय हा आरक्षणाचा आधार असून वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यावर भर देणे गरजेचे आहे डॉ.आंबेडकर यांचे योगदान नव्या पिढीला समजणे गरजेचे आहे त्या दृष्टीने संविधान मंदिर उपक्रम अतिशय उपयुक्त ठरेल असे उपराष्ट्रपती धनखड यांनी यावेळी सांगितले जागतिक लोकशाही दिवस सर्वत्र साजरा होत असतांना भारत हा सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे तो विविधतेनेही एकता जपून आहे याचा आपल्याला अभिमान आहे याचे सर्व श्रेय आपल्या संविधानाला आहे भारतीय हीच आपली पहिली ओळख असून राज्य घटनेबद्दल आपण सदैव आदर बाळगला पाहिजे असे धनखड शेवटी म्हणाले या कार्यक्रमा प्रसंगी कोपरगाव येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत भन्साळी उद्योग समूहाचे संजय भन्साळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव चव्हाण संविधान अभ्यासक ॲड.नितीन पोळ सामाजिक कार्यकर्ते निसार शेख शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थेचे आयटीआय चे प्राचार्य अभय दुणाखे सर तसेच कोपरगाव आयटीआयचे प्राचार्य जाधव सर चक्रधर आयटीआय चे गाढवे सर यांच्यासह कोपरगाव आयटीआय मधील शिक्षक दिदोर्डे सर, कळणे सर, जाधव सर, चव्हाण सर, भालेराव सर, भास्कर सर, वानखेडकर सर, कुरापती मॅडम, पाटील सर, जोशी सर, पवार मॅडम बोधी सर, आव्हाड सर, घोगरे सर, पानगव्हाणे सर, रायते सर, डोखे सर, आचारी सर, वाकचौरे सर यांच्या सह चतुर्थश्रेणी कर्मचारी आव्हाड, तावडे, नाईकवाडे, डुंबरे, छजलानी, माळी यांच्यासह श्री साईबाबा संस्थान आयटीआय तसेच शारदा ज्युनिअर कॉलेज राहता व चक्रधर स्वामी आयटीआय कोपरगाव प्रवरा आयटीआय लोणी आयटीआय राहता येथील सर्व शिक्षक शिक्षिका व सर्व कर्मचारी व विद्यार्थी याप्रसंगी मोठे संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब शिंदे सर यांनी केले.