आमदार आशुतोष काळे उद्योग समूह

मा.आ.अशोकराव काळे यांच्या वाढदिवसा निमित्त गौतम पब्लिक स्कूलमध्ये वृक्षारोपण

0 5 3 5 5 1

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलमध्ये संस्थेचे चेअरमन मा.आ.अशोकराव काळे यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच वाढदिवसा निमित्त गौतमच्या फुटबॉल मैदानावर शासकीय तालुका स्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य नूर शेख यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी बोलतांना सौ.चैतालीताई काळे म्हणाल्या की, दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल अधिकच बिघडत चालला आहे. त्यामुळे भविष्यात काय परिणाम भोगावे लागू शकतात हे यावर्षीच्या उन्हाळ्यात वाढलेल्या प्रचंड उष्णतेवरून जाणवले आहे. त्याचा धडा घेवून पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलाचा दुष्परिणाम येणाऱ्या पिढीला भोगावा लागू नये यासाठी वेळीच सावध होणे गरजेचे आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. त्यासाठी प्रत्येकाने दरवर्षी एक झाड लावून त्याचे संगोपन करावे असे आवाहन सौ.चैतालीताई काळे यांनी यावेळी केले.मा.आ.अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी ७१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत विविध प्रजातींचे एकूण १०७१ वृक्षारोपण शालेय परिसरात लावणार असल्याचा संकल्प प्राचार्य नूर शेख यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी प्राचार्य नूर शेख व सौ.रईसा शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व शिक्षक बंधूंच्या हस्ते ब्रम्हा, विष्णू, महेश (त्रिगुणी) झाडाचे रोपण करून करण्यात आले. तसेच कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल काकडी विद्यालयामध्ये देखील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या समवेत वृक्षारोपण करण्यात आले. एनसीसी कॅडेट्स, स्काऊट, एनसीसी एएनओ उत्तम सोनवणे, स्काऊट मास्टर नासिर पठाण, कॅम्पस सुपरवायझर सुनील सूर्यवंशी, दिनकर मुठे यांनी वृक्षारोपण कामी मेहनत घेतली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 5 5 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे