आमदार आशुतोष काळे उद्योग समूह

कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी महायुती शासनाकडून सर्वोतोपरी मदत मिळवून देईल –आ.आशुतोष काळे

0 5 3 5 4 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

मतदार संघातील मतदारांनी सव्वा लाखाचे मताधिक्य दिल्यामुळे माझी जबाबदारी निश्चितपणे वाढली आहे याची मला जाणीव आहे. मतदार संघाचा लोकप्रतिनिधी व महायुती शासनाचा प्रतिनिधी या नात्याने महायुती शासनाच्या माध्यमातून कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला महायुती शासनाकडून आवश्यक असणारी सर्वोतोपरी मदत मिळवून देईल अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजार समिती कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील मोर्वीस याठीकाणी सुरु करण्यात येणार असून गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या उपबाजार समितीचे भूमिपूजन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ.आशुतोष काळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखाना व उद्योगसमुहाचे मार्गदर्शक बिपीनराव कोल्हे होते. याप्रसंगी गोदावरी दुध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, शिवसेना नेते नितीन औताडे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण, व संचालक मंडळ, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे व संचालक मंडळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम, उपसभापती गोवर्धन परजणे व सर्व संचालक मंडळ, तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने पूर्व भागात शिरसगाव येथे उपबाजार समिती सुरु केल्यानंतर मोर्वीस येथे उपबाजार समिती सुरु करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. त्यामुळे या भागातील जे शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी लासलगाव, विंचूर, बसवंत पिंपळगाव याठिकाणी जात होते त्या शेतकऱ्यांसाठी मोर्वीस उपबाजार समिती हक्काचे व्यासपीठ होणार आहे. परंतु भविष्यात तालुक्याच्या नैऋत्य भागातील रांजणगाव देशमुख व परिसरातील शेतकऱ्यांसाठी देखील उपबाजार समिती सुरु करण्याचा निर्णय घ्यावा. कारण त्या त्या अकरा गावातील पाण्याची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आपण उजनी उपसा जलसिंचन योजना दरवर्षी प्रभावीपणे चालविल्यामुळे व निळवंडेचे पाणी प्रत्येक गावात पोहोचविल्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यास मदत झाली आहे. त्यामुळे एकेकाळी पिण्याच्या पाण्यासाठी ज्या ठिकाणी टँकर सुरु करावे लागत होते त्या गावांकडून टँकरची मागणी होत नाही व त्या भागातील शेतकरी देखील चांगल्या प्रकारची पिके घेत आहेत. त्यामुळे कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने नैऋत्य भागातील रांजणगाव देशमुख व परिसरातील अकरा गावात सुद्धा उपबाजार समिती सुरु करून त्या भागातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा.पश्चिम भागासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या राज्य मार्ग ०७ साठी यापूर्वी १० कोटी निधी देवून काम पूर्ण करण्यात आले आहे. परंतु हा राज्यमार्ग अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या राज्यमार्गाला देर्डे फाटा ते तालुका हद्दीपर्यंत २३२ कोटीचा निधी दिला आहे. राष्ट्रीय महामार्गाप्रमाणे या राज्य मार्गाचे काम होणार असून प्रत्यक्षात कामाला सुरुवात पण झालेली आहे. पश्चिम भागातील शेतकऱ्यांसाठी मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा विषय देखील अत्यंत जिव्हाळ्याचा होता. या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ४१.५१ कोटी निधी असून मंजूर बंधाऱ्याचे शाश्वत काम होवून शेतकऱ्यांसाठी मंजूरचा कोल्हापूर टाईप बंधारा पुन्हा उभा राहणार आहे. शहा वीज उपकेंद्राला कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव, सुरेगाव उपकेंद्राबरोबरच चासनळी वीज उपकेंद्र जोडले जाणार आहे. त्यामुळे चासनळी उपकेंद्रावरून वीजपुरवठा होणाऱ्या चास हंडेवांडी कारवाडी व परिसरातील गावातील शेतकरी, व्यावसायिक व घरगुती वीज ग्राहकांच्या विजेच्या समस्या कायमच्या निकाली निघनार आहेत. अशा प्रकारे तालुक्याच्या पश्चिम भागातील शेती व शेतकऱ्यांचे व नागरिकांचे सर्व विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यात जनतेच्या मतदार संघातील आशीर्वादाने यश आले आहे.कोपरगाव कृषी उत्पन्न बाजारसमिती मध्ये शेतकरी केंद्रस्थानी ठेवतांना राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वांनी सहकार्य केले सर्वांच्या सहकार्यातून कोपरगाव बाजार समितीला पुढे घेवून जावू. सर्वांनी विधानसभा निवडणुकीत प्रचार केला व मतदारांनी देखील भरभरून मतदान केल्यामुळे मला मिळालेल्या मोठ्या मताधिक्यामुळे माझी जबाबदारी वाढलेली आहे. त्यामुळे महायुती शासनाच्या माध्यमातून लागणारी सर्व मदत मिळवून देवून शेतकऱ्यांचे हित साधले जावून कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकिक कसा वाढेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 5 4 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे