कोपरगाव पंचायत समितीत सोमवारी आ.आशुतोष काळे यांचा जनता दरबार

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या पंचायत समितीच्या संदर्भात विविध तक्रारी सोडविण्यासाठी सोमवार (दि.१७ ) फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता कोपरगाव पंचायत समितीच्या सभागृहात आ.आशुतोष काळे जनता दरबार घेणार आहेत अशी माहिती आ.आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून नागरिकांना देण्यात आली आहे.कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडचणींचा निपटारा करण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी जनता दरबार हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.त्यामुळे नागरिकांच्या प्रशासकीय समस्या सुटण्यास मोठी मदत झाली आहे. त्यामुळे जनता दरबारात समस्या घेवून येणाऱ्या मतदार संघातील नागरिकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वाढत्या नागरिकांची संख्या लक्षात घेवून आ. आशुतोष काळे यांनी आठच दिवसात दुसरा जनता दरबार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

नागरिकांच्या अडचणी सबंधित अधिकार्यांच्या पुढे मांडल्या जावुन त्याच ठिकाणी सदर प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक होणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या वर्षानुवर्ष प्रलंबित असणार्या सर्वच तक्रारींचे निवारण एकाच ठिकाणी करण्यात येणार आहे. नागरीकांनी आपल्या पंचायत समितीच्या सर्व विभागाच्या संदर्भात तसेच पशु संवर्धन विभाग, शासकीय पशु पैदास केंद्र (वळूमाता) आदी प्रशासकीय विभागाच्या बाबतीत काही अडचणी किंवा प्रश्न असतील त्याबाबत लेखी स्वरूपात आपला अर्ज घेवून यावेत असे आवाहन आ.आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून नागरिकांना करण्यात आले आहे.