काकडी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे कोपरगाव तालुक्यातील काकडी येथील न्यू इंग्लिश स्कूल काकडी विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना आगामी परीक्षेसाठी शुभेच्छा व विद्यालयाकडून निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख मान्यवरांनी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जवळके धोंडेवाडी येथील शेतकरी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बंडू गायकर होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी कर्मवीर स्व.शंकराव काळे व सौ.सुशीलामाई काळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांचा परिचय व कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब गुडघे यांनी केले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना बंडू गायकर म्हणाले की,

विद्यार्थ्यांनी नेहमी स्वतःशी प्रामाणिक राहावे याचबरोबर शिक्षणा मधून आपल्याला जीवनामध्ये उत्कर्ष कसा साधता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे.आपली उन्नती साधण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे असा बहुमोल सल्ला देवून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राहाता लायन्स क्लबचे संस्थापक विनोद गाडेकर,सदस्य सचिन लोढा साहेब,ए.म.ए.डी.सी शिर्डीचे सिव्हिल इंजिनिअर निलेश डांगे,अहिल्यानगर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष व न्यू इंग्लिश स्कूल देर्डे चांदवड विद्यालयाचे मुख्याधापक प्रकाश देशमुख यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.पूजा सोनवणे हिने केले.कु.भक्ती गायकवाड हिने आभार मानले.