गुलाबी साडी फेम सिंगर संजू राठोड रविवारी कोपरगावात आ.आशुतोष काळे व प्रियदर्शनी महिला मंडळाच्या नवरात्र उत्सव कार्यक्रमाला लावणार हजेरी

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
चित्रपटसृष्टीत आपल्या जिद्द आणि कष्टाच्या जोरावर आपले वेगळे स्थान निर्माण करणारा ‘गुलाबी साडी आणि लाली लाल लाल–दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ’ काही महिन्यापूर्वी आलेल्या ह्या गाण्याचे प्रसिद्ध गायक संजू राठोड रविवार (दि.०६) रोजी आ.आशुतोष काळे व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ कोपरगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्र महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी कोपरगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आबेडकर मैदान या ठिकाणी सायंकाळी ६.०० वाजता उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.सध्या सोशल मिडीयाचा जमाना असून सोशल मीडियावर एखादी गोष्ट ट्रेन्ड झाली की, ती सर्वत्र व्हायरल होते याचा प्रत्यय सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होणारं ‘गुलाबी साडी’ या गाण्यावरून दिसून येत आहे. रस्त्यावरच्या चहाच्या टपरीपासून ते मोठमोठ्या पार्ट्यांमध्ये सातत्याने वाजणारे ‘गुलाबी साडी आणि लाली लाल लाल…दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ’ ह्या गाण्याच्या ओळी गुणगुणल्या जात आहेत. या गाण्याचे प्रसिद्ध गायक संजू राठोड नवनवीन गाण्यांमुळे अल्पावधीतच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले आहे. त्याच्या गाण्यांनी सर्व प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्याचं ‘गुलाबी साडी’ हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं असून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात धुमाकूळ घातला आहे.नवरात्र महोत्सवाचे औचीत्य साधत आ.आशुतोष काळे व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ कोपरगाव यांच्या वतीने संजू राठोड यांच्या गीतांची मेजवानी रविवार (दि.०६) रोजी कोपरगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आबेडकर मैदान या ठिकाणी सायंकाळी ६.०० वाजता रसिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.